महाराष्ट्रात किमान ४० ते ५० हजार कोटींची गुंतवणूक आणणार -उदय सामंत
पुणे : राज्यातील उद्योगधंद्यांवरुन पुन्हा एकदा राजकीय खळबळ सुरु झाली आहे. एकीकडं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी सकाळी सिनारमास हा नवा १०,५०० कोटींचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात येणार असल्याची घोषणा केली पाईपलाईनमध्ये
.किमान ४० ते ५० हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणणार आहे. दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला आहे.
सामंत म्हणाले, आदित्य ठाकरेंच्या प्रेसला उत्तर देण्याऐवजी मला आनंदाची गोष्ट सांगायची आहे. पुण्यात जर्मनचं शिष्टमंडळ आलं होतं, त्यांना भेटायला आलो होतो. जर्मन उद्योग वाढवण्यासाठी नवीन उद्योग इकडे आणण्यासाठी आज एक बैठक पार पडली. महाराष्ट्र सरकारला देखील त्यांनी आश्वासन दिलं की, उद्योग वाढवण्यासाठी जे उद्योग रखडले होते ते सुरू करु. असे उदय सामंत म्हणाले.
महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या ज्या प्रकल्पामुळं राज्यातील राजकारण ढवळून निघालं होतं. त्या वेदांना-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबतही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, मी ठामपणाने सांगतो की, वेदांता फॉक्कॉन यांच्याशी MOU झाला नव्हता. असे उदय सामंत म्हणाले.
उदय सामंत म्हणाले,१५ जुलै रोजी पॉवर मीटिंग झाली यावेळच्या MOU मध्ये अनिल अगरवाल आणि शासनाची सही होती का बघावं. MOU करण्यासाठी यावं असं पत्र सरकारनं अनिल अगरवाल यांनी दिलं होतं. आज सकाळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सिनारमास कंपनीला ३०० हेक्टर जागा दिल्यांचही यावेळी त्यांनी सांगितलं.
