Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

डीईएस प्रायमरी स्कूलला विजेतेपद

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) प्राथमिक शाळांसाठी संस्थेने आयोजित केलेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत डीईएस प्रायमरी (सकाळ विभाग) शाळेने फिरत्या चषकासह सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.

सांघिक स्पर्धेतील विजेते संघ पुढीलप्रमाणे
डॉजबॉल (मुले) – मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, डॉजबॉल (मुली) – डीईएस प्रायमरी स्कूल, लंगडी (मुले) – नवीन मराठी शाळा, लंगडी (मुली) – एच. ए. स्कूल, 10 पासेस (मुले आणि मुली) -डीईएस प्रायमरी स्कूल

वैयक्तिक गटात धावणे, बॅटन रिले, मनोरा रचने, लगोरी रचने, कोन गोळा करणे आदी स्पर्धा घेण्यात आल्या विद्यार्थ्यांनी योगा, मल्लखांब, तायक्वांदो, जिम्नॅस्टिक, लाठीकाठी आदी प्रात्याक्षिके सादर केली.
समग्र शिक्षा अभियानाच्या पुणे मनपा प्रकल्प अधिकारी डॉ. मनोरमा आवारे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. आगाशे कॉलेजचे प्रा. शरद आहेर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.

डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, संचालक खेमराज रणपिसे, प्रा. प्राजक्ता प्रधान यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापिका स्मिता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका ग्रेसी डिसोझा, सिमरन गुजर, क्रीडा शिक्षक श्रीकांत जोशी, योगिनी कानडे यांनी संयोजन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading