Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कधी कधी आम्ही जे बोलतो ती आमची वैयक्तिक भूमिका असते अजित पवार यांचा राज ठाकरे यांना टोला

पुणे: अजित पवार यांनी महापुरुषांचे विषय काढून वाद नको, अशी भूमिका घेतली. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही आपल्या सभेत अशीच भूमिका घेतली.यानंतर पत्रकारांनी अजित पवारांना महापुरुषांच्या विषयावर राज ठाकरेंनी तुमचं ऐकलं का? अशी विचारणा केली.अजित पवार म्हणाले, राज ठाकरेंचे विचार त्यांच्याबरोबर, माझे विचार माझ्याबरोबर आहेत. आम्ही स्पष्टपणे बोलतो. आमच्या ‘ओठात एक आणि पोटात एक’ अशी भावना कधीच नसते. हे बऱ्याच जणांना माहिती आहे. म्हणून मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला होता. कधी कधी आम्ही जे बोलतो ती आमची वैयक्तिक भूमिका असते, ती पक्षाची भूमिका नसते. असे वक्तव्य करून अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.

केंद्र सरकारच्या नव्या योजनेनुसार रोजगार मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री अनेकांना स्वहस्ते नियुक्तीपत्रे देत आहेत.विद्यार्थी स्वतःच्या मेहनीते पुढे येऊन अभ्यास करतात आणि पास होतात, त्यामुळे सरकारने नौटंकी करू नये, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

अजित पवार म्हणाले की, आजपर्यंत राज्याची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत अनेक भरत्या झाल्या. पोलीस भरती झाली, महावितरणची भरती झाली. शिक्षकांची भरती झाली. वेगवेगळ्या डिपार्टमेंटची भरती झाली. कधीही भरती होत असताना त्यांची ऑर्डर मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देत नव्हते. कधीच देत नव्हते. उमेदवार परीक्षा देऊन पास होतात. वशीला लावत नाहीत. एमपीएससी किंवा इतर परीक्षेतून ते नियुक्त होत असतात, असं अजित पवार म्हणाले.
सरकारच्या नाकर्तेपणामुळे, दुर्लक्षपणामुळे मोठे उद्योग परराज्यात गेले. त्यामुळे तरुण मुला-मुलींच्या मनात सरकाविषयी वेगळं वातावरण निर्माण झालं आहे. हे वातावरण दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे सरकार तरुणांना स्वहस्ते ऑर्डर देत आहेत. ऑर्डर पोस्टाने जाईल, इमेलने जाईल. पण असा प्रकार पहिल्यांदाच पाहिला. आम्ही आर आर पाटील यांच्या काळात दरवर्षी १३ हजार भरती करत होतो. म्हणजे ६५ हजारांची भरती केली. पण असा दिखावा केला नाही. असं अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading