Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

पुणे:आंतरराष्ट्रीय कीर्ती चे प्रसिद्ध कथक नर्तक डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांना भारत सरकार चा संगीत नाटक अकादमी हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. कथक नृत्यातील सर्वांगीण योगदानाबद्दल हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांना मा.राष्ट्रपती यांच्या हस्ते दिल्ली येथे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. डाॅ.पं.नंदकिशोर कपोते हे भारत सरकार चा संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे पिंपरी-चिंचवड शहरातील एकमेव पहिले कलाकार आहेत. डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांना याआधी महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2004 साली, महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार 2010 साली देण्यात आला आहे. तसेच भारत सरकारची सिनीयर फेलोशिप देऊन सन्मानित करण्यात आले आहे. डॉ.नंदकिशोर कपोते हे कथक नृत्यात पी.एच. डी.डॉक्टरेट मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले कथक नर्तक आहेत . डॉ.नंदकिशोर कपोते हे सध्या डाॅ.डी.वाय.पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स चे डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading