Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

मनसेचे वसंत मोरे पुन्हा एकदा नाराज मनसेमधील अंतर्गत गटबाजी समोर

पुणे :मनसे प्रमुख राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. आज त्यांची सभा होणार आहे. एकीकडे राज ठाकरे यांचा कोकण दौरा सुरू असताना दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा पुण्यातील मनसेची अंतर्गत गटबाजी समोर आली आहे.मनसे नेते वसंत मोरे नाराज असल्याचं दिसतंय. दोन दिवसांपूर्वी मनसेचा शहर पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्याला वसंत मोरे यांची देखील उपस्थिती होती. मात्र शहर पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित असूनही मेळाव्यात त्यांना बोलण्याची संंधी न दिल्यानं ते नाराज झाले आहेत.
मनसेमधील अंतर्गत गटबाजी समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी देखील अंतर्गत गटबाजी समोर आली होती. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळीही मनसेमधील गटबाजी पहायला मिळाली.
वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वसंत मोरे म्हणाले की, मी नाराज नाही तर कार्यकर्ते नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे शहरात शाखा अध्यक्षांचा मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये सर्व कोअर कमिटीचे मेंबर आले होते. मी ही त्या स्टेजवर बसलो आहे तर मला बोलू दिलं जाईल, असं कार्यकर्त्यांना वाटलं होतं. परंतु मला बोलायची संधी दिली नाही, त्यामुळे कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि तात्या आम्ही तुम्हाला ऐकायला आलो होतो. तुम्ही का भाषण नाही केलं? असा प्रश्न विचारला. मी म्हटलं, भाषणाच्या यादीत माझं नावच नाही तर मी कसं भाषण करणार?, असंही वसंत मोरे म्हणाले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading