मंगळवार पेठेतील नागरिकांनी केला संविधानाचा जागर
पुणे:माणूस हा केंद्र बिंदू मानून समाजाचा विकास साधण्याचा काम संविधानाने शिकवलं आहे. संविधान हे अजूनही जनमानसात हव तस रुजलं नाही ते रुजवण्याच काम आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. आज संविधानावर हल्ले होत आहे. संविधान बदलण्याचं षडयंत्र चालू आहे. आज जर कोणी बोललं तर देशद्रोही बोललं जात ED लावली जाते. अशा सर्व गोष्टींना एक जबाबदार नागरिक म्हणून आपण विरोध केला पाहिजे अस परखड मत दत्ता पोळ यांनी मांडलं. निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व लोकायत आयोजित संविधानाचा जागर या मंगळवार पेठेतील कार्यक्रमाचा.
वस्तीतील नागरिकांना संविधानातील समता, स्वांतत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता मुल्यांच महत्व सोप्या भाषेत लोकायतच्या समन्वयक ॲड. मोनाली अर्पणा यांनी मांडलं. त्या म्हणाल्या की भारतातील विविध जाती जमाती धर्माच्या लोकांना एकत्र बांधून ठेवण्यात महत्वाची भूमिका संविधानाने राबवली. संविधानाचा जयघोष करत घोषणा व गाणी ही यावेळी घेण्यात आली.
या कार्यक्रमाला वस्तीतील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची शेवट सामूहिकपणे संविधानाच्या प्रस्तविकेच वाचन करून झालं. सूत्रसंचालन विशाल बागुल यांनी केले
