Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

काँग्रेस च्या वतीने सर्व धर्मिय प्रार्थना व संविधानाची शपथ घेऊन ‘‘संविधान दिन’’ साजरा.

पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ‘‘संविधान दिन’’ निमित्त सर्व धर्मिय प्रार्थना व संविधानाची शपथ घेण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘संविधानाने या देशामध्ये सर्व धर्मिय लोकांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार दिला. १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये संविधानाने सरकार स्थापन झाल्यानंतर हे संविधान सांभाळण्याचे काम व संविधानाने देश चालविण्याचे काम हे काँग्रेस पक्षाने केले. महात्मा गांधींच्या दूरदृष्टी मुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे जगविख्यात विद्वानाने या देशाची घटना तयार करून या देशाच्या जडण घडणीला सुरूवात केली. आज सर्वधर्मांचे ग्रंथ जेवढे पवित्र आहेत त्याचपध्दतीने संविधानालाही सर्वधर्मिय ग्रंथ म्हणून पुजले गेले पाहिजे. संविधान हा या भारताचा आत्मा असून यासाठी सर्व देशातील देशप्रेमींनी एकत्र येऊन जाती पाती व धर्मा धर्मातील द्वेष विसरून देशाच्या प्रगतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. हेच खरे संविधान वाचविण्यासाठीचे उचित कार्य ठरेल.’’

 यानंतर हिंदू धर्माचे वेदमूर्ती श्री. गणेश कुलकर्णी, बौध्द समाजाचे भन्ते संघपाल, ख्रिस्ती समाजाचे पास्टर पिटर जार्ज, शिख धर्माचे ग्यानी सुखवीरसिंग व मुस्लिम धर्मचे मौलाना मुफती अहमद हुसेन काझमी यांनी सर्व धर्मिय प्रार्थना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित यादव यांनी केले तर आभार महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पुजा आनंद यांनी मानले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस संजय बालगुडे, दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, पुजा आनंद, नगरसेवक लता राजगुरू, अजित दरेकर, गोपाळ तिवारी, रजनी त्रिभुवन, मेहबुब नदाफ, राजेंद्र शिरसाट, शिलार रतनगिरी, सुजित यादव, राहुल शिरसाट, सुनिल शिंदे, द. स. पोळेकर, सचिन आडेकर, सुनिल घाडगे, रमेश सोनकांबळे, भरत सुराणा, अरूण कटारिया, विठ्ठल गायकवाड, अन्थोनी जेकब, रजिया बल्लारी, गुलाम हुसेन, लतेंद्र भिंगारे, अजय खुळे, भगवान कडू, बाळू कांबळे, दिलीप लोळगे, विल्सन चंदेलवेल, प्रकाश पवार, मुन्ना खंडेलवाल, फिरोज शेख, सचिन सुडगे, दयानंद तानवडे, रमाकांत साठे, साजिद खान, जॉन्सन हिरे, आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading