Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

श्री सद्गुरू साईबाबा संस्थेचा पालखी सोहळा उत्साहात

श्री सद्गुरू साईबाबा सेवा संस्थेचा साई उत्सव २०२२ : विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

पुणे : कर्वेनगर मधील श्री सद्गुरू साई बाबा सेवा संस्थेच्या वतीने साई उत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री साईबाबा पालखीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. भक्ती पूर्ण वातावरणात साईबाबा पालखीची नगर प्रदक्षिणा संपन्न झाली. उत्सवाचे यंदा १४ वे वर्ष आहे.

यावेळी श्री सद्गुरू साईबाबा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुषार कैलास झेंडे, वैभव नवसे, उमेश झेंडे, विजय मोरे, कुमार लांडे, कैलास जाधव, साईप्रसाद दंगेकर, ओमकार लांडगे, अमोल शिंदे, संजय पवळे, संदीप गवळी आणि मित्र परिवार उपस्थित होते. दिनांक २३ ते २७ नोव्हेंबर दरम्यान साई उत्सव होणार आहे.

तुषार झेंडे म्हणाले, साई उत्सवानिमित्त विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये साई मूर्तीचे मंगल स्नान, साई पादुकांची महापूजा व अभिषेक श्री साई सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद साईबाबांची सांज आरती व महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ (बोपगाव) पुरंदर आणि लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था प्रस्तुत साई भजने, प्रसिद्ध गायक साईभक्त बबलू दुग्गल प्रस्तुत संतांची गाथा हे कार्यक्रम देखील साई उत्सवात होणार आहेत. याशिवाय दिनांक २७ नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading