fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे महापालिकेत तीन सदस्यीय प्रभाग रचना होणार

पुणे : आगामी महापालिकेच्या निवडणुकीतील प्रभागरचनेवरून मागील महाविकास आघाडी सरकार आणि शिंदे फडणवीस सरकार यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याचे दिसून येत होते. महाविकास आघाडीचा तीन प्रभागांचा निर्णय आताचा सरकार रद्द करणार, नव्याने प्रभागरचना होणार अशी शक्यता होती. आगामी महापालिका निवडणुकांसाठी राज्य सरकारने नव्याने प्रभाग रचना करण्यासाठी आदेश दिले होते. या आदेशात नेमकी कसली स्पष्टता दिसून येत नाही. मात्र आता पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून जुन्या निर्णयाप्रमाणे प्रभागरचनेच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर केवळ निवडणुकांसाठी सदस्य संख्या कमी करण्यात आली आहे.

मागील महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला होता. या निर्णयात कसलाही बदल किंवा फेरफार कलेला नाही.या निर्णयानुसारच आता कामकाजाला सुरूवात करण्यात येत आहे. नवीन कोणतेही आदेश शासनाकडून किंवा निवडणूक आयोगाकडून अजूनही आलेले नाहीत. यामुळे महापालिकेने जानेवारी 2022च्या आदेशानुसारच प्रभाग रचना करण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
मार्च 2022 न्यायालयानच्या सुनावणीत ओबीसी आरक्षण मंजूरी मिळीली नव्हती. यामुळे निवडणूक पुढे जावी, यासाठी मविआ सरकारने तीन सदस्य प्रभाग रचनेचा निर्णय घेतला. सत्तांतर घडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने 2017 च्या धर्तीवर निवडणूक कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, असा स्पष्ट आदेशचा निर्णय महापालिकेस अजूनपर्यंत मिळालेला नाही. यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. महापालिका प्रशासन आता तीन सदस्यीय रचनेनुसारच नव्याने प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला. याबाबत आता पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: