महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांचे मोलाचे योगदान: श्रीरंग चव्हाण पाटील
पुणे : महाराष्ट्राच्या जडणघडणीत राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील यांनी धायरी येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.
खडकवासला काँग्रेस च्या वतीने यशवंतराव चव्हाण यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
चव्हाण पाटील म्हणाले, कृषी, उद्योग, सहकार अशा विविध क्षेत्राच्या विकासाला त्यांनी गती दिली. महाराष्ट्राला पुरोगामित्वाची दिशा देऊन मोठे करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
याप्रसंगी उपस्थित वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य मिलिंद पोकळे, पुणे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी पर्यावरण उपाध्यक्ष धनंजय पाटील, अंबादास बिरादार, अनिकेत देशमुख, आदी उपस्थित होते.