fbpx

महाराष्ट्र – कर्नाटक सीमेजवळील सुमारे ८६५ गावांसाठी मोठी घोषणा करणार- चंद्रकांत पाटील

पुणे : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावर्ती भागातील गावांवर दावा केल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. याच मुद्द्यावरुन महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून राज्यातील सत्ताधारयानी शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावर्ती भागातील गावांबाबत केलेल्य वक्तव्याप्रमाणे काही होणार नाही. सध्याचं महाराष्ट्र सरकार बिचकणारं नाही. बसवराज बोम्मई यांना देवेंद्र फडणवीसांनी बरोबर उत्तर दिलं आहे. आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळील सुमारे ८६५ गावांवर जो अन्याय होतो आहे, त्या सगळ्या गावांसाठी आगामी काळात एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे या भागातील तरुण खूश होईल असा निर्णय घेतला लवकरच घेतला जाणार आहे असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

एनएचएआय आणि एका संस्थने याआधी नवले पुलावर होणार्या अपघातांवर अनेक उपाययोजना केल्या होत्या. आणि त्याचाच परिणाम म्हणून तेथील अपघात कमी झाले होते. मात्र, या पूलाबाबत सखोल अभ्यास केला गेला असून रविवारचा अपघात हा जवळपास ९ महिन्यानंतर झाला आहे. नवले पुलावरील उजव्या बाजूचा ट्रॅक हा अवजड वाहनांसाठी ७ किलोमीटरपर्यंत आरक्षित राहावा. डावी बाजू नाही आरक्षित करता येणार नाही कारण पुढे सर्व्हिस रोड जोडले जातात. मात्र, नवलेसारखा एवढा मोठा ब्रीज तोडून पुन्हा बांधता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका पाटील यांनी मांडली आहे.
पुणे जिल्ह्याच्या सर्व भागात पिण्याला, शेतीला पाणी कमी पडणार नाही. जिल्हयातील १०० टक्के धरणं भरली आहेत. आपण जे पाणी वापरतो ते ट्रीट केले पाहिजे. म्हणजे त्याचा उपयोग अनेक ठिकाणी होईल. तसेच जायका प्रकल्पाचं काम देखील येत्या काही दिवसांत काम सुरू होईल अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: