fbpx

आबेदा इनामदार संघाला आंतरमहाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धेत विजेतेपद

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे शहर विभागीय क्रीडा समिती व ए. के. के. न्यू लॉ अकादमी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धेतील मुलांच्या गटात आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय संघाने मॉडर्न महाविद्यालयाचा (शिवाजीनगर) ६-१ होमरनने पराभव करताना स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या अंतिम लढतीत आबेदा इनामदार संघाकडून केतन बनसोडेने २ तर  गणेश भराटे, चैतन्य पवार, दानिश दलाल व साहिल मन्सुरी यांनी प्रत्येकी एक होमरन केला. मॉडर्न महाविद्यालय संघाच्या कल्पेशने एक होमरन केला.

उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय संघाने आरएमडीएसटीआयसी संघाला ६-० अशी एकतर्फी मात दिली. आबेदा इनामदार संघाकडून गणेश भराटे, केतन बनसोडे, चैतन्य पवार, दानिश दलाल, किरण पवार व सचिन यादव यांनी प्रत्येकी एक होमरन केला. आरएमडीएसटीआयसी संघाला एकही होमरन नोंदविता आला नाही.

उपांत्य फेरीचा दुसऱ्या लढतीत मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर संघाने सीएसीपीइ संघाला ७-१ असे पराभूत केले. या लढतीत मॉडर्न महाविद्यालयाच्या वतीने लक्ष्मीकांतने २ तर उत्कर्ष, शिवम, सौरभ, कल्पेश व आदित्य यांनी प्रत्येकी एक होमरन केला. सीएसीपीइ संघाकडून शुभमने एक होमरान नोंदविला.

Leave a Reply

%d bloggers like this: