fbpx

सरकारने वाचावीरांचा तात्काळ बंदोबस्त करावा – अॕड. मनोज आखरे

पुणे : महाराष्ट्रातील प्रमुख प्रश्नांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जाणीवपूर्वक बगल देत आहेत. विनाकारण चुकी मुद्दे उपस्थित करून वाचाळविरांकडून महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातील महापुरुषांची बदनामी केली जात आहे. हे कमजोर सरकारचे लक्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वान महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा गौरवच झाला पाहिजे. मात्र घटनात्मक प्रमुख राज्यपाल भगतसिंह कोशारी हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज व इतर बहुजन महापुरुषांची बदनामी करत आहेत यांची तात्काळ महाराष्ट्रातून हकालपट्टी झाली पाहिजे. महाराष्ट्र आणि भारत शांत ठेवायचं असेल तर राज्यपाल असो की भाजपचा राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी असो अशा वाचाळविरांची तात्काळ हकालपट्टी झाली पाहिजे अशीच भूमिका आमची आहे. या अशा शिवद्रोह्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी यापुढे सहन करून घेतली जाणार नाही. सरकारने वाचावीरांचा तात्काळ बंदोबस्त करावा… अन्यथा गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे असे मत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॕड. मनोज आखरे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय शिवस्मारकाचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदीजींनी उद्घाटन करून सुद्धा अरबी समुद्रात शिवस्मारक झालं नाही. संभाजी ब्रिगेडच्या शिवस्मारक बाबतच्या भूमिकेचा सरकार विचार करत नाही, म्हणून शिवसमारक पूर्ण होत नाही. महाराष्ट्रात आरोग्य आणि शिक्षणाचा प्रमुख प्रश्न प्रत्येकाला भेडसावत असताना सरकार याकडे दुर्लक्ष करतात हे दुर्दैवी आहे. याबाबत संभाजी ब्रिगेड आक्रमक भूमिका घेणार आहे. आम्ही शांत आहोत म्हणून आमच्या सहनशीलतेचा अंत कोणीही पाहू नये. अन्यथा महाराष्ट्रात अत्यंत तीव्र पद्धतीने रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय यांनी लक्षात घ्यावे.

संभाजी ब्रिगेडचा राज्यस्तरीय वर्धापन दिन सोहळा बुधवार दि.३० नोव्हेंबर २०२२ रोजी दु. ०३ः०० वा. नाशिक येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक सभागृह, मुंबई नाका, नाशिक येथे होणार आहे. राज्यभरातून हजारो कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित राहणार असून संभाजी ब्रिगेडची ”रोखठोक भूमिका” यावेळी जाहीर करण्यात येणार आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे सन्माननीय अध्यक्ष अॕड. मनोज आखरे, महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, दक्षिण जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: