स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन
२५ हजारांपर्यंत बक्षीस जिंकण्याची संधी
पुणे: केंद्र व राज्य शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२३ ची घोषणा करण्यात आली असून ‘ वेस्ट टू वेल्थ ‘ ही संकल्पना घेण्यात आली आहे. या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग नोंदविण्याच्या दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्र व पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ टेक्नॉलॉजी चॅलेंज’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठीची नावनोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ३० नोव्हेंबर पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे. या स्पर्धेत नागरिक, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, विविध स्वयंसेवी संस्था, नागरिक समूह, नवे लघुउद्योजक, तांत्रिक व अतांत्रिक कॉर्पोरेट यात सहभागी होऊ शकतात.
सामाजिक समावेशकता, शून्य कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन आणि पारदर्शकता या चार मुख्य विषयावर स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://forms.gle/Yn3eBH3wgzQnydtm8 यामध्ये माहिती भरावी.
या स्पर्धेत सर्वोत्तम तांत्रिक कल्पना सादर करणाऱ्या पहिल्या तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिक तसेच विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्नांवर तोडगा काढत नाविन्यपूर्ण संकल्पना मांडण्याची संधी मिळत आहे. स्टार्टअप देखील यात सहभागी होऊ शकत आहेत. त्यामुळे सर्वांनीच या संधीचा लाभ घेत देशाच्या विकासासाठी हातभार लावावा.
- डॉ.संजय ढोले, संचालक
नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्र
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
अधिक माहितीसाठी संपर्क –