fbpx

सामाजिक कार्यकर्ते अभिजीत महामुनी यांना पुणे गौरव पुरस्कार प्रदान

पुणे : सामाजिक कार्यकर्ते अभिजीत महामुनी यांना जिद्द फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा कै. लक्ष्मण शिंदे स्मृती पुणे गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात हा पुरस्कार वितरण समारंभ झाला.

यावेळी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे डॉ. संजय चोरडिया, लिज्जत पापड उद्योग समूहाचे सुरेश कोते,  डॉ.दत्ता कोहिनकर, विजय बाबर उपस्थित होते. पुरस्काराचे यंदा अकरावे वर्ष आहे.

अभिजीत महामुनी हे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे संघटक सचिव आहेत. तसेच ते नाना पेठेतील हिंदमाता तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. विद्यार्थी संघटनेच्या चळवळीत देखील ते कार्यरत असून त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला आहे. कोविड काळात गरजूंना मदतीचा हात देण्याकरिता देखील त्यांनी पुढाकार घेतला होता.

महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असणाऱ्या पुण्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना जिद्द फाउंडेशनच्या वतीने पुणे गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा त्या पुरस्कारांपैकी एक पुरस्कार अभिजीत महामुनी यांना प्रदान करण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: