fbpx

कै. बट्टुराव जगताप उद्यानाची तातडीने दुरुस्ती करून उद्यानात ओपन जीम उभारावी

तानाजी जवळकर व शामभाऊ जगताप यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पिंपरी : पिंपळे गुरव येथील कै. बट्टुराव जगताप उद्यानाची दुरावस्था झाली असून, महापालिका प्रशासनाने याची तातडीने दुरुस्ती करावी; तसेच या उद्यानात ओपन जीम उभारण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तानाजी जवळकर व माजी शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

कै. बट्टुराव जगताप उद्यानाची दुरवस्था, तसेच उद्यानात ओपन जीमच्या मागणीचे निवेदन यावेळी आयुक्तांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे, की येथील सृष्टी चौकानजिक बट्टूराव जगताप उद्यान सुरू करण्यात आलेले आहे. या उद्यानाची अवस्था गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत खराब झाली आहे. स्वच्छतागृह जॉगिंग ट्रॅक खराब अवस्थेत आहेत. झाडांची छाटणी व्यवस्थित केलेली नाही. या उद्यानामध्ये जॉगिंग ट्रॅक असून नसल्यासारखा आहे. सर्वत्र गवत वाढले आहे. परिसरातील तरुण, तरुणी, महिला, जेष्ठ नागरिक सकाळ सायंकाळ फिरण्यासाठी या उद्यानामध्ये येत असतात. सुदर्शननगर, जवळकरनगर, वैदूवस्ती, काशीद पार्क, अनंत नगर, महाराष्ट्र कॉलनी, निसर्ग कॉलनी, गुलमोहर कॉलनी, प्रभात नगर, भैरवनाथ नगर, कल्पतरू इस्टेट, ट्रेझर पार्क अशा सर्व भागातील नागरिकांनी या संदर्भात ओपन जिमची मागणी केलेली आहे.
तसेच पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीमधील स्वच्छतागृह सर्व सुविधांनीयुक्त सुरू करण्यात यावे, अशी मागणीही तानाजी जवळकर व शामभाऊ जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. याविषयी बोलतना तानाजी जवळकर म्हणाले, की सृष्टी चौक येथे अनेक अडचणीनंतर कै.बट्टुराव जगताप हे उद्यान सुरू करण्यात आले. हे उद्यान सुरू झाल्यापासून या उद्यानाची देखरेख व्यवस्थित करण्यात येत नाही. वारंवार याविषयी आवाज उठवून आयुक्तांना निवेदन दिले व कामे करुन घेतली.

Leave a Reply

%d bloggers like this: