fbpx

एअर इंडिया तर्फे यूएसए, यूरोपसाठी मुंबई आणि दिल्लीहून विना-थांबा उड्डाणे सुरू   

  • मुंबई हून न्यूयॉर्क (जे एफ के), फ्रँकफर्ट आणि पॅरिससाठी विमाने वाढविली
  • दिल्ली हून कोपेनहेगन, मिलान आणि विएन्ना साठी विमान पुन्हा चालू
  • भारतापासून या आंतरराष्ट्रीय स्थळांपर्यंत न थांबता उड्डाण करणारी एअर इंडिया ही एकमेव विमान कंपनी

नवी दिल्ली :भारतातील आघाडीची विमान कंपनी आणि स्टार अलायन्स सदस्य एअर इंडिया ने आज मुंबई हून न्यूयॉर्क, फ्रॅंकफर्ट आणि पॅरिस ला जोडणारी नवीन उड्डाणे आणि दिल्ली हून कोपेनहेगन, मिलान आणि विएन्नाला जोडणारी विना-थांबा उड्डाण पुन्हा सुरू करून जागतिक स्तरावर विस्ताराची आणि बळकटी आणण्याची घोषणा केली.

ही नवीन मुंबई ते न्यूयॉर्क सेवा ‘जॉन एफ केनडी आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्यूयॉर्क’पर्यंत दररोज ‘बी ७७७-२०० एल आर’ एअर क्राफ्ट  वापरुन देण्यात येणार आहे आणि ही सेवा १४ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू होईल. एअर इंडियाच्या दिल्ली ते  ‘जॉन एफ केनडी आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्यूयॉर्क’पर्यंत आणि नेवार्क् लिबर्टी विमानतळासाठी चार साप्ताहिक उड्डाणे या सध्याच्या सेवेला ही नवीन सेवा पूरक असेल. यामुळे एयर इंडिया ची भारत अमेरिका फ्रिक्वेन्सी दर आठवड्याला ४७ विना-थांबा फ्लाइटस् वर जाईल.

यूरोपसाठी एअर इंडिया १ फेब्रुवारी, २०२३ पासून आठवड्यातून चार वेळा  दिल्ली-मिलान व्ही व्ही विमानसेवा आणि १८ फेब्रुवारी, २०२३ पासून दिल्ली-विएन्नाला व्ही व्ही साठी आणि १ मार्च, २०२३ पासून दिल्ली- कोपेनहेगन व्ही व्ही या दोन्ही ठिकाणांसाठी आठवड्यातून तीनदा अशी विमान सेवा चालू करणार आहे. मुंबई हून पॅरिस कडे आठवड्यातून तीनदा जाणारी नवीन विमानसेवा आणि मुंबईहून फ्रॅंकफर्टला आठवड्यातून चार वेळा जाणारी विमानसेवा पुढच्या तिमाही मध्ये चालू होईल. ही सर्व उड्डाणे एअर इंडियाच्या बी ७८७-८ ड्रीमलाइनर विमानद्वारे चालविली जातील; ज्यामध्ये १८ बिझनेस क्लास आणि २३८ इकॉनॉमी क्लास च्या सीटस् असतील.

ही उड्डाणे पुन्हा चालू केल्यामुळे, एअर इंडिया यूरोप मधील सात शहरांना ७९ साप्ताहिक विना-थांबा फ्लाइटस सह; ४८ यूनायटेड किंगडम ला आणि ३१ यूरोप खंडाला,  सेवा देईल.

Flight Schedules

Mumbai – New York (JFK) Schedule from February 14, 2023
Flight No Dept Arp Dept Time Arvl Arp Arrv Time Type Frequency
AI 0119 BOM 00:55 JFK 06:55 B777-200LR Daily
AI 0116 JFK 10:55 BOM 11:35 + 1 B777-200LR Daily
Delhi – Milan (MXP) Schedule from February 1, 2023
Flight No Dept Arp Dept Time Arvl Arp Arrv Time Type Frequency
AI 0137 DEL 14:20 MXP 18:30 B787-8 4x weekly
AI 0138 MXP 20:00 DEL 08:00 + 1 B787-8 4x weekly
Delhi – Vienna Schedule from February 18, 2023
Flight No Dept Arp Dept Time Arvl Arp Arrv Time Type Frequency
AI 0153 DEL 14:35 VIE 18:45 B787-8 3x weekly
AI 0154 VIE 20:15 DEL 08:05 + 1 B787-8 3x weekly
Delhi – Copenhagen Schedule from March 1, 2023
Flight No Dept Arp Dept Time Arvl Arp Arrv Time Type Frequency
AI 0157 DEL 13:30 CPH 17:50 B787-8 3x weekly
AI 0158 CPH 19:50 DEL 07:40 + 1 B787-8 3x weekly

Leave a Reply

%d bloggers like this: