Thursday, August 27, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune – नवले पुलावर पुन्हा अपघात, कंटेनरची दुभाजकाला धडक

पुणे : पुण्यातील नवले पुलावरील अपघाताचं सत्र संपत नसल्याचे चित्र आहे. नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झाला आहे. या अपघातात तीन ते चार वाहनांचं नुकसान झालं आहे. रविवारी झालेल्या भीषण अपघाताच्या जागीच हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तीव्र उतारावर कंटेनरने दुभाजकाला धडक दिली आहे. यात काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. कात्रजकडून हा कंटेनर मुंबईच्या दिशेने जात होता. कंटेनरने रस्त्यामधील दुभाजकाला धडक दिली. यात कंटेनरचंदेखील नुकसान झालं आहे.

नवले पूल हा सध्या मृत्यूचा सापळा बनत आहे. रविवारी रात्री याच पुलावर भीषण अपघात झाला होता. साता-याहून पुण्याच्या दिशेने येणा-या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक समोरील वाहनांना धडकत पुढे गेला. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात तेल गळती झाल्याने वाहतूक बराच वेळ थांबवावी लागली होती. यात २४ गाड्यांचं नुकसान झालं होतं. पुण्यातील नवले पूल हे अपघातांचं केंद्र बनलं असून अनेक निष्पापांना प्राण गमवावे लागले आहेत. तीव्र उतार आणि वळणे एकत्र झाल्याने पुण्यातील नवले पुलाचा भाग अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading