Friday, August 28, 2026
BusinessLatest News

हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया कडून भारतातील ३५५ उपेक्षित कुटुंबांना घरगुती सौरऊर्जा उपाय प्रदान करण्यासाठी रॉकवेल ऑटोमेशनशी भागीदारी

पुणे : गृहनिर्माण क्षेत्रात कार्यरत अग्रगण्य ना-नफा संस्था हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाने बेंगळुरू (कर्नाटक)चेन्नई (तामिळनाडू)दिल्लीपुणे (महाराष्ट्र)कांगपोकपीचुराचंदपूर आणि तामेंगलाँग (मणिपूर) आणि पश्चिम बर्धमान (पश्चिम बंगाल) या जिल्ह्यांमधील ३५५ उपेक्षित कुटुंबांना सौरविजेद्वारे घरगुती प्रकाश प्रणालीद्वारे शाश्वत आणि अक्षय्य ऊर्जा उपाय प्रदान करण्यासाठी रॉकवेल ऑटोमेशनशी भागीदारीची घोषणा केली आहे.

सखोल गरजांचे मूल्यांकन आणि आधारभूत सर्वेक्षण केल्यानंतरहॅबिटॅट इंडियाने बेंगळुरूचेन्नई आणि दिल्ली येथे प्रत्येकी ५० कुटुंबेपुण्यात ४० कुटुंबेमणिपूरमध्ये १०० कुटुंबे आणि पश्चिम बंगालमध्ये ६५ कुटुंबे लाभार्थी म्हणून निश्चित केली आहेत. लाभार्थी कुटुंबांमध्ये रोजंदारीवर काम करणारेविधवाशारीरिक अपंगत्व असलेले लोकइरुला जमातीचे लोकसंथाल जमातीरोंगमेई जमाती आणि इतर अल्प उत्पन्न किंवा उपेक्षित समुदाय यांचा समावेश होतो. प्रत्येक सोलर होम लाइटिंग प्रणाली संचामध्ये चार्जिंग पॉईंटपेडेस्टल फॅनसोलर बॅटरीचार्ज कंट्रोलर आणि एलईडी दिवे यांचा समावेश आहे.

या उपक्रमावर भाष्य करतानाहॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजन सॅम्युअलम्हणाले, “हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाने आपल्या कामाच्या केंद्रस्थानी लोकांना ठेवण्यावर नेहमीच विश्वास राखला असूनचांगली स्वच्छतापाण्याची उपलब्धता असलेल्या नीटनेटक्या घरांसाठी आवश्यक ते पाठबळ देऊनआरोग्यदायी गृहनिर्माण परिसंस्था तयार करण्याला हातभार लावला आहे. तसेच घराला घरपण देण्यासाठी आवश्यक इतर घरगुती आणि सामुदायिक स्तरावरील पायाभूत सुविधांच्या विकसनावरही तिचा भर राहिला आहे. सौरऊर्जेचा वापर केल्यास या ३५५ कुटुंबांच्या राहणीमानात सुधारणा होईल. कुटुंबातील सदस्य दिवसा बाहेर त्यांची घरगुती कामे करू शकतात आणि मुले रात्रीही अभ्यास करू शकतात. या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केल्याबद्दल आम्ही रॉकवेल ऑटोमेशनचे आभार मानतो.

सौरऊर्जा उपकरणांच्या वितरणाव्यतिरिक्तया कुटुंबांना त्याच्या हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाद्वारे सेल्को फाऊंडेशन या भागीदाराच्या सहयोगाने या उपकरणांचा वापर आणि देखरेखीच्या दृष्टीने माहितीप्रात्यक्षिक व प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading