24 नोव्हेंबर रोजी पुण्यात म्युच्युअल फंड वितरकांसाठी आयडीएफसी म्युच्युअल फंडची कार्यशाळा
पुणे: आयडीएफसी म्युच्युअल फंडने म्युच्युअल फंड वितरकांसाठी (एमएफडी ) गुरुवार, 24 नोव्हेंबर 2022 रोजी रामी ग्रँड हॉटेल, आपटे रोड, शिवाजीनगर, पुणे येथे दुपारी 4:00 वाजता कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत अर्थव्यवस्थेत सध्या दिसत असलेल्या बदलांशी ताळमेळ राखत बाजाराची चक्रे समजून घेणे, ग्राहकांच्या वर्तणुकीचे स्वरूप कसे व्यवस्थापित करावे, बाजारातील बदलांवर अवलंबून उत्पादनांचे योग्य स्थान नियोजन कसे करावे बदलत्या परिस्थितीनुसार गुंतवणुकीच्या उपायांना गुंतवणुकदारांच्या हितासाठी कार्य करण्यासाठी त्यांचे नेतृत्व करणे यावर भर देणारी सत्रे असतील. वितरक आयडीएफसी म्युच्युअल फंडात नोंदणीकृत आहे की नाही याची पर्वा न करता, ते कार्यशाळेला उपस्थित राहू शकतात. इच्छुक म्युच्युअल फंड वितरक कार्यशाळेसाठी स्वतःची नोंदणी करण्यासाठी पुण्यातील आयडीएफसी म्युच्युअल फंड शाखा कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.
हे सत्र ग्राहक कुंडलीवर लक्ष केंद्रित करेल, हा कार्यक्रम एमएफडी ला त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित ग्राहक प्रोफाइलिंगमध्ये मदत करतो. कार्यक्रम एमएफडी ला त्यांच्या संभाव्य तसेच विद्यमान ग्राहकांना समजून घेण्यास मदत करेल. हे एमएफडी ला ग्राहकांचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म समजून घेण्यास मदत करते आणि ग्राहकांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित प्रभावी वर्तन आणि संप्रेषण पद्धतींसाठी त्यांना उपयुक्त साधने प्रदान करते . बाजारातील अस्थिरतेच्या वेळी कशी प्रतिक्रिया द्यायची हे समजून घेताना ही वर्तणुकीतील अंतर कमी करण्यासाठी कार्यशाळा तंत्रे आणि रोड मॅप सुचवते आणि पैशांच्या बाबतीत ग्राहकांच्या भावना कशा हाताळायच्या याबद्दल अधिक चांगले अंतर्दृष्टी देऊ शकतात.
आयडीएफसी म्युच्युअल फंडाने अलाहाबाद, लखनौ, दुर्गापूर, आसनसोल, जमशेदपूर, धनबाद, रांची, गोरखपूर आणि गुवाहाटी येथे एमएफडी साठी अशाच प्रकारच्या कार्यशाळा आयोजित केल्या आहेत ज्यात 400 हून अधिक एमएफडी सहभागी झाले आहेत आणि वर्तणूक वित्त मोड्यूलमधील विविध ( ह्युरिस्टिक) पूर्वानुभवावर आणि पूर्वाग्रहांवर मिळालेल्या ज्ञानाचा फायदा झाला आहे.
