Thursday, August 27, 2026
Latest NewsPUNE

इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून प्रवास वर्णने महत्वाची – संदीप परांजपे यांचे मत

पुणे : भारतात आलेल्या परकीय प्रवाशांनी प्रवास वर्णने लिहिली, त्यांची प्रवास वर्णने वाचली तर भारताची सांपत्तिक स्थिती किती समृद्ध होती हे लक्षात येते. या प्रवास वर्णनातून त्यांचे प्रवासी मार्ग, शहरांची वर्णने, वेशभूषा, भोजन, चलन इत्यादी अनेक गोष्टींची माहिती मिळते. इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून प्रवास वर्णने महत्वाची आहेत. असे मत इतिहास अभ्यासक संदीप परांजपे यांनी व्यक्त केले.

डॉ. चंद्रशेखर गणेश पेशवे आणि इतिहास संस्कृती कट्टा आयोजित व्याख्यानमालेच्या १४ व्या पुष्पात ‘इतिहासातील निवडक प्रवासी’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. सदाशिव पेठ येथील भारत इतिहास संशोधक मंडळात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘भारतात आलेले परकीय प्रवासी’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण देखील करण्यात आले.  मंदार लवाटे, डॉ. सचिन जोशी , एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण, जय पाठक, डॉ. शिवेंद्र काडगांवकर गोपाळ जोशी ,विशाल खुळे, चिंतामण केळकर, राजेंद्र टिपरे, महेश फळसणकर उपस्थित होते.

संदीप परांजपे म्हणाले, इसवी सन ४ थे ते १९ वे शतक या कालावधीत भारताच्या समृद्धतेच्या आकर्षणामुळे  परकीय प्रवासी भारतात आले. राजदूत, धर्मगुरू,  सैनिक, व्यापारी म्हणून  ते भारतात आले. जास्तीत जास्त प्रवासी हे पश्चिमेकडून आले याशिवाय ग्रीक, अरब, मोरोक्कन, डच, पोर्तुगीज अशा अनेक देशातून प्रवासी आले. परंतु या प्रवाशांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनांचे  मराठीत एकही भाषांतर नाही. ही प्रवासवर्णने क्लिष्ट जुन्या इंग्लिश भाषेत आहेत. त्यामुळे ती वाचण्यात अडचणी येतात आणि अनेक प्रकारच्या माहिती समजू शकत नाही, ही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. सचिन जोशी यांनी प्रास्ताविक केले. विद्याचरण पुरंदरे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading