Thursday, August 27, 2026
Latest NewsSports

आंतरशालेय हॉकी : लॉयला, सेंट जोसेफ प्रशाला विजेते

पुणे ः लॉयला प्रशाला आणि सेंट जोसेफ मुलांच्या प्रशाला संघाने दुसऱ्या फादर शॉक स्मृती आंतरशालेय हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविले.

मेजर ध्यानचंगद मैदानावर मंगळवारी झालेल्या सामन्यात अंतिम लढतीत १४ वर्षांखालील गटात सेंट जोसेफ प्रशाला संघाने लॉयला प्रसालेचा ३-० असा पराभव केला. सामन्याच्या १८व्या मिनिटाला स्वरद कांबळेने पेनल्टी कॉर्नरवर संघाचे खाते उघडले.

त्यानंतर दर्शन राठोडने ३६ आणि निलकंड देवळने ४९व्या मिनिटाला गोल करून संघाचा विजय निश्चित केली.

मुलांच्या १७ वर्षांखालील गटात लॉयला प्रशाला संघाने पराभवाची परतफेड करताना सेंट जोसेफ प्रशालेचा २-१ असा पराभव केला.

मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीत राहिलेल्या सामन्यात उत्तरार्धातील खेळात ३८व्या मिनिटाला आयन पागेदारने गोल करून लॉयला प्रशाला संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अयान सय्यदने ४५व्या मिनिटाला बरोबरी साधली. मात्र, केविन अरुणने ५४व्या सामन्याला गोल करून संघाचा विजय निश्चित केला.

स्पर्धेतील १४ वर्षांखालील वयोगटात सेंट पॅट्रिक प्रशाला संघाने शौर्य मेंगेने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर ज्योती इंग्लिश स्कूलचा २-० असा पराभव करून तिसरे स्थान पटकावले.

सेंट उर्सुला प्रशाला संघ १७ वर्षांखालील गटात तिसऱ्या स्थानावर राहिला. त्यांनी नियोजित वेळेतील गोलशून्य बरोबरीनंतर शूट-आऊटमध्ये मॉडर्न प्रशाला संघाचा ३-१ असा पराभव केला.

स्पर्धेचा पारितोषिक वितरसण समारंभ लॉयला प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि प्रिन्सिपॉल फादर केनेश मिस्किटा एस.जे. यांच्या हस्ते पार पडला. यावेळी लॉयला प्रशालेचे प्रिन्सिपॉल फादर अनिश एसजे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज वाळवेकर, संयोजन समितीचे कार्याध्यक्ष नितीन जोओशी, , सदस्य अमित केंच उपस्थित होते.

स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके

१४ वर्षांखालील संजित नार्वेकर (लॉयला प्रशाला, गोलरक्षक), आर्यन ठकार (लॉयला प्रशाला, बचावपटू), ध्रुव शहा (सेंट जोसेफ प्रशाला, मध्यरक्षक), निलकंठ देवळे (सेंट जोसेफ , फॉरवर्ड)
१७ वर्षांखालील – रुद्रसेन खिलारे (लॉयला प्रशाला, गोलरक्षक), ओम दांगट (लॉयला प्रशाला, बचावपटू), विपुल कुंडगर (सेंट जोसेफ प्रशाला, मध्यरक्षक), आयन पागेदार (लॉयला प्रशाला, फरॉवर्ड)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading