fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोर ‘माफीवीर’चे फ्लेक्स

पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान सावरकर यांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याचे पुरावे सादर केल्यांनतर राज्यभरात त्यावर प्रतिक्रिया उमठल्या. पुण्यात युवक काँग्रेसकडून सावरकरांच्या पुतळ्यासमोर ‘माफीवीर’चे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. युवक काँग्रेसचे सचिव रोहन सुरवसे पाटील यांनी हे फ्लेक्स लावले आहेत.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान जे पुरावे सादर केले ते पुरावे या बॅनरमधून लावण्यात आले आहेत. पुण्यात सारसबाग परिसरात असलेल्या सावरकरांच्या या पुतळ्याजवळ हे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

सावरकर यांच्याबाबत काय म्हणाले होते राहुल गांधी?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांना मदत करत होता, तर सावरकरांना इंग्रजांकडून भत्ता मिळत होता. हे एतिहासिक तथ्य आहे की, स्वातंत्र्याच्या लढाईत हे कुठेही दिसले नाहीत. हे सत्य भाजपच्या नेत्यांनी मान्य करावं. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत इंग्रजांविरोधात लढा दिला. अनेक वर्ष त्यांना तुरुंगात राहावं लागलं.

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल यांच्यासह अनेक नेत्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला. द्वेष पसरणारे व्यक्ती कोण आहेत आणि ते कोणत्या समाजातून आले, याचा काहीही फरक पडत नाही. द्वेष आणि हिंसा पसरवणे हे देशाविरोधी कार्य आहे. आम्ही त्या प्रत्येक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात लढणार आहोत. हे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading