Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राहुल गांधींनी सावरकरांविषयी केलेलं वक्तव्य मागे घ्यावे व आपली चूक दुरुस्त करावी – चंद्रकांत पाटील

पुणे:काँग्रेस नेते राहुल गांधींच्या सावरकरविरोधी वक्तव्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. राहुल गांधी व काँग्रेसविरोधात भाजप आक्रमक झाली असून, विविध ठिकाणी राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तसेच भाजपाकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, यावर आता भाजपचे नेते व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना टिका राहुल गांधींना एक सल्ला दिला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले,राहुल गांधींनी सावरकरांविषयी केलेलं वक्तव्य मागे घ्यावे व आपली चूक दुरुस्त करावी असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, आजानची स्पर्धा घेण याकडे गाडी चालली होती ती ट्रॅकवर आली. लव्ह जिहाद, धर्मांतरण या विषयावर त्यांच्याही मनात आग पेटली ही चांगली गोष्ट आहे. ही कॉंग्रेसच्या पेटू शकत नाही. कारण ही त्यांची वोटबॅंक आहे. ही वोटबॅंक उद्धव ठाकरें यांची कधीच नव्हती. सरकार आणि वोटबॅंकपायी त्यांना मोह झाला आणि तेही त्यांच्या सुरात सूर मिसळायला लागले. जर सावरकरांच्या निमत्ताने ही चूक झाली हे लक्षात आलं असेल तर ती सुधारणे सर्वसामान्यांना आवडेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
याचा अर्थ त्यांनी भाजपशी समझोता करून सरकार स्थापन केलं पाहीजे असं काही नाही. आता आम्ही खूप पुढे गेलो. आता आम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सहज सरकार आणू, त्या निवडणुकांमध्ये आम्ही इतके मजबूत असू. त्यामुळे आम्हाला शिंदे यांची शिवसेना पुरेशी आहे.असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading