सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतर्फे पालक मेळावा २०२२ चे आयोजन
पुणे: शिक्षण क्षेत्रातील आघाडीच्या सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी किवळे तर्फे पालक मेळावा २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांतर्गत कौशल्याधारित शिक्षणाचे महत्व आणि संधी, तसेच स्कूल ऑफ ब्युटी अँड वेलनेस तर्फे १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या जीवनातील येणाऱ्या आव्हानांचा आढावा घेण्यात येणार आहे .
सदरील मेळावा हा शनिवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत किवळे येथील सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये होणार आहे . या मेळाव्यात प्रमुख वक्ते एनसीएल आणि आयआयएसइआरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू , ग्लोबल करियर कौन्सिलर निधी भंडारे , एसएसपीयु येथील स्कुल ऑफ ब्युटी अँड वेलनेस चे प्राध्यापक ऋषी भारद्वाज उपस्थितांना योग्य मार्गदर्शन करणार आहेत .
हा उपक्रम पूर्णतः निःशुल्क असून सदरील मेळाव्यासाठी इच्छुक पालकांनी http://bitly.ws/wHuyया संकेतस्थाळावर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच अधिक माहितीसाठी ७७७३९००७७३ वर संपर्क साधावा असे आवाहन सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतर्फे करण्यात आले आहे. या मेळाव्यात नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आढावा , नव्या युगातील कौशल्य-आधारित शिक्षणाचे महत्व ,करिअर समुपदेशन, बारावीमधील विद्यार्थ्यांचे ताण – तणावांचे व्यवस्थापन , कौशल्यावर आधारित रोजगाराच्या नवीन संधी, उद्योजकतेसाठी चा मार्ग याविषयी मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.
