बालदिनाच्या निमित्ताने अदानी गुजरात जायंटसचे कौशल्य पाहण्यासाठी संपर्क अनाथलयातील मुलांची उपस्थिती
पुणे : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त 14नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय बालदिनाच्या निमित्ताने पार पडलेल्या एका विशेष कबड्डी सामन्यात अदानी गुजरात जायंटस विरूद्ध हरियाणा स्टिलर्स या संघातील खेळाडूंनी संपर्क अनाथनाल्यातील बालकांच्या उपस्थितीत आपल्या कौशल्याचे दर्शन घडविले. हा खास सामना श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडला.
पुण्यातील संपर्क अनाथलयातील ही संस्था अनाथ बालकांबरोबरच आदिवासी तसेच वंचित वर्गातील बालके ग्रामीण परिसरातील महिला व युवक यांचे आरोग्यपूर्ण संगोपन, शिक्षण, कौशल्य विकास आणि सबलीकरण करण्याचा प्रयत्न आपल्या अनाथनालयाच्या तसेच शाळा आणि आरोग्यसेवेच्या माध्यमातून करीत असते. यामुळे या सर्व दुर्बल घटकांना समान संधी आणि समाजात प्रतिष्ठा या बरोबरच त्यांच्या मध्ये शिक्षण व स्वयंपूर्णता याबाबतीत जागरूकता निर्माण होते.
संपर्क या संस्थेतील 100हुन अधिक बालकांनी या सामन्याला उपस्थित राहून खेळाडूंच्या कौशल्याचा आनंद लुटला. त्यांनी दोन्ही संघातील खेळाडूंना जोरदार प्रोत्साहनही दिले.
गुजरात जायंटस संघाचा पुढील सामना बंगळुरू बुल्स विरुध्द 18 नोव्हेंबर रोजी हैद्राबाद येथे होणार आहे चारमिनार सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हैद्राबाद मध्ये गुजरात जायंटसचा पहिलाच सामना ठरेल.
