Friday, May 29, 2026
Latest NewsSports

‘क्रिक् चॅलेंजर्स करंडक’ १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !!

पुणे : क्रिक् चॅलेंजर्स तर्फे ‘क्रिक् चॅलेंजर्स करंडक’ १४ वर्षाखालील मुलांच्या २५-२५ षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १७ ते २४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बापूसाहेब शेलार क्रिकेट मैदान (ब्रिलीयन्ट् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी), येवलेवाडी येथे होणार आहे.

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक नंदकिशोर कुमावत यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून मुलांच्या १४ वर्षाखालील वयोगटासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरासह नाशिक जिल्ह्यातील तसेच संभाजीनगर (औरंगाबाद) येथील प्रत्येकी एक संघ असे एकूण ८ संघ या आंतरक्लब स्पर्धेत सहभागी झाले आहे. स्पर्धेचा प्रत्येक सामना हा २५-२५ षटकांचा असणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना हा ५०-५० षटकांचा होणार आहे. स्पर्धेचे सामने गटसाखळी आणि बाद फेरीमध्ये होणार आहेत.

या स्पर्धेत ब्रिलीयन्ट् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी, पेस अ‍ॅथलेटिक क्रिकेट अ‍ॅकॅडमी, एच.के. बाऊंस क्रिकेट अ‍ॅकॅडमी, क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी, इंद्रायु क्रिकेट अ‍ॅकॅडमी, धीरज जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी, नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिमखाना आणि संभाजीनगरचा एमजीएम क्रिकेट अ‍ॅकॅडमी या ८ निमंत्रित संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे, नंदकिशोर कुमावत यांनी सांगितले.

स्पर्धेच्या उद्धघाटनाच्या वर्षी पेस अ‍ॅथलेटिक क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने विजेतेपद तर, ब्रिलीयन्ट् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघाने उपविजेतेपद मिळवले होते.

स्पर्धेतील विजेत्या संघाला आणि उपविजेत्या संघाला करंडक आणि मेडल्स् मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, उदयोन्मुख खेळाडू याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ही वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर आणि फायटर ऑफ द मॅच अशी पारितोषिके देण्यात आहेत.

स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना एच. के. बाऊंस क्रिकेट अ‍ॅकॅॅडमी आणि क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी या दोन संघांमध्ये होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading