Friday, May 29, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आळंदी यात्रेनिमित्त पीएमपीएमएल कडून जादा बसेसचे नियोजन

पुणे : कार्तिकी एकादशी व श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त श्री. क्षेत्र आळंदी,
यात्रेसाठी दिनांक १७/११/२०२२ ते दिनांक २३/११/२०२२ या कालावधी करिता मार्गावरील ९७ व जादा २०३ सर्व
मिळून ३०० बसेस देण्यात येत असून दिनांक १९/११/२०२२ ते दिनांक २२/११/२०२२ या चार दिवसा करिता रात्रौ
बससेवा गरजेनुसार देण्यात येत आहे. त्याचा तपशिल खालील प्रमाणे आहे. यात्रेनिमित्ताने आळंदी गावातील सध्याचे
बसस्थानक स्थलांतरीत करून ते काटेवस्ती येथून संचलन करण्यात येत आहे.

यात्रेसाठी जादा बससेवा देण्यात येणारी ठिकाणे / स्थानके.

१ स्वारगेट ते आळंदी दि. १९/११/२०२२ ते दि. २२/११/२०२२ रात्रौ बससेवा.

दि. १७, १८/११/२०२२ व दि.२३/११/२०२२ रोजी रात्रौ. २४ वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध राहील.

२ हडपसर ते आळंदी दि. १९/११/२०२२ ते दि. २२/११/२०२२ रात्रौ बससेवा.

दि. १७, १८/११/२०२२ व दि.२३/११/२०२२ रोजी रात्रौ. २४ वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध राहील.

३ पुणेस्टेशन ते आळंदी दि. १९/११/२०२२ ते दि. २२/११/२०२२ रात्रौ बससेवा.
दि. १७, १८/११/२०२२ व दि.२३/११/२०२२ रोजी रात्रौ. २४ वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध राहील.

म.न.पा. भवन ते आळंदी

दि. १९/११/२०२२ ते दि. २२/११/२०२२ रात्रौ बससेवा.
दि. १७, १८/११/२०२२ व दि.२३/११/२०२२ रोजी रात्रौ. २४ वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध राहील.

५ निगडी ते आळंदी दि. १९/११/२०२२ ते दि. २२/११/२०२२ रात्रौ बससेवा.

दि. १७, १८/११/२०२२ व दि.२३/११/२०२२ रोजी रात्रौ. २४ वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध राहील.

६ पिंपरी ते आळंदी दि. १९/११/२०२२ ते दि. २२/११/२०२२ रात्रौ बससेवा.

दि. १७, १८/११/२०२२ व दि.२३/११/२०२२ रोजी रात्रौ. २४ वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध राहील.

७ चिंचवड ते आळंदी दि. १९/११/२०२२ ते दि. २२/११/२०२२ रात्रौ बससेवा.

दि. १७, १८/११/२०२२ व दि.२३/११/२०२२ रोजी रात्रौ. २४ वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध राहील.

८ देहूगाव ते आळंदी दि. १९/११/२०२२ ते दि. २२/११/२०२२ रात्रौ बससेवा.

दि. १७, १८/११/२०२२ व दि.२३/११/२०२२ रोजी रात्रौ. २४ वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध राहील.

९ भोसरी ते आळंदी दि. १९/११/२०२२ ते दि. २२/११/२०२२ रात्रौ बससेवा.

दि. १७, १८/११/२०२२ व दि.२३/११/२०२२ रोजी रात्रौ. २४ वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध राहील.

१० रहाटणी ते आळंदी दि. १९/११/२०२२ ते दि. २२/११/२०२२ रात्रौ बससेवा.

दि. १७, १८/११/२०२२ व दि.२३/११/२०२२ रोजी रात्रौ. २४ वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध राहील.

वरील स्थानकाहून देण्यात येणारी बससेवा ही दि. १९/११/२०२२ ते दि. २२/११/२०२२ पर्यंत रात्रौ बससेवा
गरजेनुसार देण्यात येणारआहे. यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या रात्रौ २२.०० वा. नंतर जादा बससेवेसाठी (नेहमीची बससेवा संपल्यानंतर) सध्याच्या तिकिट दरा पेक्षा रूपये ५/- जादा तिकिट दर आकारणी करण्यात येईल. तसेच, पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या एकदिवसीय, साप्ताहिक, मासिक, जेष्ठ नागरिक व इतर पासधारकास यात्राकालावधीत रात्रौ २२.०० वा.
नंतर जादा बससेवेसाठी पासचा वापर करून प्रवास करता येणार नाही.
उपरोक्त आळंदी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी जादा बससेवा देणे गरजेचे आहे. सदरची
गरज ही महामंडळाकडील सध्याच्याच बसेसमधुन पूर्ण करणे भाग पडत आहे. यासाठी शहरातील बसमार्गावरील
संचलनात असलेल्या बसेसमधूनच काही बसेस कमी करून गरज भागविण्यात येईल. त्याचप्रमाणे आळंदी मार्गावरील मार्ग
क्रमांक २६४ भोसरी ते पाबळ व मार्ग क्रमांक २५७ आळंदी ते मरकळ हे मार्ग यात्रेच्या काळात संपूर्णत: बंद राहतील. तरी
संबंधित मार्गावरील प्रवाशी नागरिकांनी पी.एम.पी.एम.एल. ला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading