Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विनयभंग प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी आज ठाणे कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने आव्हाडांना मोठा दिलासा देत पोलीस यंत्रणा आणि भाजपला धक्का दिला आहे.  विनयभंग प्रकरणी आव्हाड यांना जामीन मंजूर केला आहे. अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.

ठाण्यातील पूल उद्घाटनाच्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला हात धरून बाजूला केलं होतं. या प्रकरणी आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविरोधात त्यांनी कोर्टात धाव घेतली. आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर आज ठाणे कोर्टामध्ये सुनावणी झाली. कोर्टाने आव्हाड यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.  न्यायाधीश प्रणय गुप्ता यांनी आव्हाडांच्या अटक पूर्व जामीन अर्जावर निर्णय दिला.

दरम्यान, सुनावणी सुरू होण्याआधी एसीपी सोनाली ढोले यांनी जोरदार दावा केला होता. या प्रकरणी मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरण संवेदनशील आहे. हाताने बाजूला केले आहे. आरोपी राजकीय बलाढ्य व्यक्ती आहे त्यामुळे अटक पूर्व जामीन दिल्यास गुन्ह्यावर परिणाम होईल. त्यांना अटक पूर्व जामीन देवू नये. तसंच वर्तकनगर पोलिसांनी दिलेल्या जामिनात अट आहे. जामिनावर असताना कोणताही गुन्हा करु नये, अशी मागणी ढोले यांनी केली.

तर आव्हाड यांच्या वतीने गजानन चव्हाण यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात लॅपटॉप आणला होता. ज्यावर न्यायाधिशांना घडलेल्या प्रकाराची क्लिप दाखवली

मुख्यमंत्री आले होते उद्घाटनला त्यावेळे खूप गर्दी होती चेंगराचेंगरी झाली असती. पत्रकार पडले असते लोकं पडले असते. घटनेच्या आधी देखील धक्काबुक्की झाली होती. ही सर्व राजकीय खेळी आहे. मी पहिल्यांदा निवडून आले तेव्हा १५ हजार मतांनी निवडून आलो. दुसऱ्यांदा मी ५० हजार मतांनी निवडून आलो. तिसऱ्यांदा मी ७५ हजारांनी निवडून आलो. हेच काही जणांना आवडत नाही. मी मंत्री राहिलोय, मी गेली १५ वर्षे आमदार आहे. राष्ट्रवादी आणि भाजप / शिंदे गट यांत जे वाद सुरु आहे हे आपण रोज बघतोय. याचाच हा एक राजकीय भाग आहे की गुन्हे दाखल केले जात आहे, असा दावा चव्हाण यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading