Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

बावनकुळे यांनी दहा वर्षापूर्वीचा गॅस दर व आत्ताचा गॅस दर स्पष्ट करावा – रोहन सुरवसे पाटील

पुणे : महागाई हा आंतरराष्ट्रीय विषय आहे त्यावर फार बोलणे काही उपयोग नाही तर दहा वर्षापूर्वी 40 हजाराला मोबाईल होता व आता चार हजाराला मिळतो म्हणजे दहा वर्षापूर्वीच्या तुलनेत स्वस्तच आहे असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी सांगितले. बावनकुळे साहेब यांना माझा एक प्रश्न आहे, दहा वर्षापूर्वीचा गॅस दर आणि आताचा गॅस दर स्पष्ट करावा असा प्रश्न प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

नुकतेच भाजचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पुणे दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महागाई या विषयी बोलताना म्हणाले होते की, जगाच्या तुलनेत आपल्यात महागाई कमीच आहे.असे म्हणून त्यांनी दहा वर्षापूर्वी 40 हजाराला मोबाईल होता आणि आज चार हजार रुपयांना मिळतो या अनुषंगाने प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना महागाविरोधात प्रश्न उपस्थित केले.पुढे बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की तसे बघितले तर आता एक हजार रुपयांना ही मोबाईल मिळतो आणि एक लाखानाही मिळतो.फरक एवढाच आहे गरीब माणूस लाख रुपयांचा मोबाईल घेऊ शकत नाही.महागाई विषय बोलायचे झाल्यास दहा वर्षापूर्वी डाळीचे भाव काय होते? पेट्रोल डिझेलचे दर काय होते?अशी कोणती जीवनावश्यक वस्तू आहे की ती दहा वर्षाच्या तुलनेत स्वस्त आहे.याचे उत्तर बावनकुळे साहेब यांच्याकडे असेलतर त्यांनी जनतेला सांगावे.असे म्हणून सुरवसे पाटील यांनी बेरोजगार तरुणांचा प्रश्न कसा मार्गी लावणार असाही प्रश्न उपस्थित केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading