क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या कामाची सुरुवात लवकरच होणार – चंद्रकांत पाटील
पुणे : क्रांतिगुरु लहुजी साळवे यांची 228 वी जयंती पुण्यातील संगमवाडी येथिल समाधीस्थळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र, आंध्र, तेलंगणा, कर्नाटक आणि मध्यप्रदेश येथून हजारो लहुजी अनुयायी क्रांतिगुरु लहुजींना अभिवादन करण्यासाठी पुण्यात आले होते.
सकाळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी महापालिकेच्यावतीने अभिवादन केले. दुपारी चार वाजता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अभिवादन केले. आपल्या भाषणात पालकमंत्र्यांनी लहुजींच्या कार्याचा उजाळा केला, आधुनिक भारताच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्रांतीचे जनक लहुजी साळवे होते, लहुजींच्या मार्गदर्शन व प्रेरणेनेच वासुदेव बळवंत फडके यांच्या सारख्या असंख्य तरुण क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा लढा उभारला. तसेच लहुजींच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले व सावित्रीमाई फुलेंनी शैक्षणिक व सामाजिक क्रांतीचा कित्ता गिरवला. आणि लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा लढा उभारला. असे गौरवास्पद उल्लेख यावेळी पालकमंत्र्यांनी केला .राज्यशासन लहुजींचे स्मारकासाठी निधीची तरतूद करुन लवकरात लवकर स्मारक पूर्ण करेल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही समधिस्थळास भेट देऊन अभिवादन केले .
क्रांतिगुरु लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे यांनी आपल्या प्रास्ताविकात लहुजी स्मारकासाठी जागा मिळवण्यासाठीचा पंधरा वर्षाचा लढ्याची माहीती दिली.
या वेळी आमदार सुनील कांबळे नगरसेवक स्वाती लोखंडे ,भूपेंद्र मुजुमदार, भास्कर नेटके रामदास साळवे, दिपक वायल ,उमेश शिंदे ,हर्षद शिंदे, अनिकेत लोखंडे, आयोजक अशोक लोखंडे संस्थापक अध्यक्ष क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक समिती ट्रस्ट संगमवाडी पुणे.
स्वागत हर्षद शिंदे यांनी केले. उमेश शिंदे यांनी आभार मानले.
