fbpx
Friday, April 26, 2024
BusinessLatest News

गोदरेज प्रॉपर्टीजची पुणे प्रकल्पाच्या सुरुवातीलाच ५०० कोटींची विक्री

पुणे : भारतातील एक अग्रगण्य रीअल इस्टेट डेव्हलपर,  गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जी पी एल) (बि एस इ स्क्रिप आय डी:- GODREJPROP)  ने आज जाहीर केले की, पुण्यातील हिंजवडी भागात त्यांनी सुरू केलेल्या गोदरेज वूडसविले या नवीन प्रकल्पाने रू ५०० कोटींच्या किमतीच्या घरांची विक्री केली आहे. सप्टेंबर मध्ये सुरू केलेल्या या प्रकल्पाची आता पर्यंत एकूण जवळपास ६.९० लाख चौरस फीट एवढ्या क्षेत्राची ६७५ हून अधिक घरे विकली गेली आहेत.

गोदरेज प्रॉपर्टीज चे व्यवस्थापकीय संचालक (एम डी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सी इ ओ) मोहित मल्होत्रा म्हणाले की, “गोदरेज वूडसविले ला मिळणाऱ्या या भरभरून प्रतिसादाने आम्हाला खूप आनंद झाला आहे. पुणे ही नेहमीच आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ ठरली आहे. आमच्या गृहप्रकल्पांची सातत्याने होणारी वाढ आमच्या वरील ग्राहकांचा विश्वास आणि प्रतिष्ठित डेव्हलपर कडून नियंत्रित, एका ठराविक चौकटीमध्ये, एकत्रित शाश्वत सुविधांसह सुरक्षित वातावरणाच्या गृहप्रकल्पांची मागणी दाखवते. आम्ही या प्रकल्पामध्ये राहणाऱ्या प्रत्येक रहिवाश्यांना सर्वोत्तम घरे आणि सोय देण्याचा पूर्ण प्रयत्न करू.”

गोदरेज वूडसविले हे पुण्यातील हिंजवडी मध्ये स्थित मुळा मुठा नदीच्या जवळ असलेले एक निवासी प्रकल्प आहे. हे प्रकल्प धोरणात्मक दृष्टीने अशा ठिकाणी आहे जेथून शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, मॉलस् आणि प्रिमियम हॉटेलस् सह हिंजवडीतील आय टी कंपन्या आणि लाइफस्टाईल हब ना सहज कनेक्टीविटी मिळेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading