Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRA

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा विषय संसदेच्या पटलावर घेऊन जाऊ राहुल गांधी यांचे छात्रभारती ला आश्वासन


नांदेड:देशातील धर्मांध राजकारण आणि दमनशाही शासनाच्या विरोधात छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यात आला होता. महाराष्ट्र राज्यातील छात्रभारतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथुन भारत जोडो पदयात्रेत सहभाग नोंदवला आणि ऐतिहासिक अशा भारत जोडो यात्रेचा अनुभव घेतला. याप्रसंगी कॉंग्रेसचे नेते मा.राहुलजी गांधी यांनी छात्रभारतीचे अनिकेत घुले, स्वाती त्रिभुवन, स्मिता कसबे, प्रशिक सोनवणे यांच्यासोबत नवीन शिक्षण धोरणाच्या विरोधातील छात्रभारती विद्यार्थी संघटनेची भुमिका समजून घेतली व कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणे म्हणजे बहुजनांच्या हातातून शिक्षण हिसकावून घेणे होय, असे उद्गार मा.राहुलजी गांधी यांनी काढले, तसेच पुढील काळात संसदेच्या पटलावर हा विषय घेऊन जाऊ असे आश्वासन कॉंग्रेसचे नेते मा.राहुलजी गांधी यांनी छात्रभारती विद्यार्थी संघटनेला दिले आहे.

.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading