fbpx
Monday, October 2, 2023
Latest NewsPUNE

संगीतकार, गायक   शेखर रावजियानी यांनी ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलला दिली भेट

पुणे : प्रसिद्ध भारतीय गायकसंगीतकार आणि मार्गदर्शक शेखर रावजियानी यांनी आज पुण्यातील ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलच्या (जीआयआयएस) हडपसर कॅम्पसला भेट दिली. शेखर हे पुरस्कारप्राप्त भारतीय संगीतकारगायकमार्गदर्शक असण्‍यासोबत मुंबईतील विशाल-शेखर संगीत-जोडीपैकी एक आहेत. विशेषत: भारतीय चित्रपटसृष्टीतील आपल्‍या उत्‍कृष्‍ट कामासाठी ओळखले जाणारे शेखर यांनी जीआयआयएसच्या ‘लीडरशिप लेक्चर सिरीज’ उपक्रमाचा एक भाग म्हणून शाळेतील सर्व वयोगटातील तरुणांशी संवाद साधलाज्यांना शेखर यांना भेटून आनंद झाला. यानंतर एक मास्टरक्लासनिवडक विद्यार्थ्यांसोबत एक संवादात्मक सत्र आयोजित केले गेलेजेथे या विद्यार्थ्‍यांनी त्‍यांचे टॅलेण्‍ट दाखवले आणि शेखर यांनी वैयक्तिकरित्या मार्गदर्शन केले.

शेखर हे हिंदी संगीतक्षेत्रातील प्रसिद्ध संगीतकार आहेतज्यांनी आपल्‍या कामासाठी अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. ते आता दोन दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीचा एक भाग आहेत. या जोडीच्‍या प्रसिद्ध गाण्यांवर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सादरीकरण करून आयकॉनचे स्वागत केले.

शेखर रावजियानी जीआयआयएस – शेखर रावजियानी स्कूल ऑफ म्युझिकचा एक भाग म्हणून २०२० पासून जीआयआयएसशी संलग्न आहेत. ही शाळा भारतातील आघाडीचे संगीतकार शेखर रावजियानी आणि सिंगापूर-स्थित ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल यांच्यातील सहयोग आहे, तसेच १० देशांमध्ये कॅम्पस असलेली प्रमुख शिक्षण संस्था जीएसएफचा भाग आहे. शाळेच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि भविष्यकालीन तंत्रज्ञानाचा वापर करून ३५,००० च्या समूहातील हुशार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. संगीत क्षेत्रातील उदयोन्‍मुख प्रतिभेला अधिक निपुण आणि मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रित उपक्रम सुरू करण्याकरिता जागतिक शिक्षण संस्था व भारतीय संगीतकार यांच्यातील हा अद्वितीय सहयोग आहे.

जीआयआयएसशेखर रावजियानी स्कूल ऑफ म्युझिकमधील उपक्रमाच्या दोन वर्षांमध्ये निवडक विद्यार्थ्यांना बहुप्रतिभावान शेखर यांचे मार्गदर्शन मिळण्याची संधी मिळालीज्यांचा समाजात येणाऱ्या प्रतिभेला संधी देण्यावर विश्वास आहे. सिंगापूरमलेशियासंयुक्त अरब अमिरातीभारत व जपानमधील अनेक विद्यार्थी सध्या मेंटॉरशिप प्राप्त करत आहेत आणि आगामी सत्रामध्ये आणखी बरेच विद्यार्थी दाखल होणार आहेत.

जीआयआयएस – शेखर रावजियानी स्कूल ऑफ म्युझिक हा जीआयआयएसच्या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाचा सर्वोत्तम विस्तार आहेजो विद्यार्थ्यांना इष्टतम अनुभव देण्यासाठी डेटा अॅनालिटिक्सच्या क्षमतेचा फायदा घेत आहे. जीआयआयएसच्या जगभरातील ३५ कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना शाळेचा अभ्‍यासक्रम उपलब्‍ध होतो.

याप्रसंगी भारतीय गायक व संगीत दिग्‍दर्शक शेखर रावजियानीम्‍हणाले, “नवोदित तरुण गायकांना मार्गदर्शन करणे आणि त्यांच्याशी संलग्न होणे हा नेहमीच सन्मान असतो. विद्यार्थी वचनबद्धउत्साही आणि मेहनती असल्‍याचे पाहून मला समाधान वाटते आणि त्यांच्या अपवादात्मक गायक बनण्याच्या प्रवासात त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. जीआयआयएस विद्यार्थ्यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि शिक्षणाव्‍यतिरिक्‍त असलेली त्‍यांची आवड जोपासण्यासाठी प्रोत्साहित करून देत असलेला पाठिंबा पाहून आनंद होत आहे.’’

भारतातील ग्‍लोबल इंडियन इंटरनॅशनल स्‍कूल (जीआयआयएस)चे कार्यसंचालनांचे संचालक राजीव बंसल म्‍हणाले, “जीआयआयएस हडपसरच्या लीडरशिप लेक्चर सीरीज उपक्रमासाठी शेखर रावजियानी यांचा सहयोग असण्‍याचा आम्हाला आनंद होत आहे. जीआयआयएसचे ९ जेम्‍स अध्यापनशास्त्र फक्‍त शिक्षणातच नाही तर सह-अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी करण्यावर देखील लक्ष केंद्रित करते आणि शेखर यांच्‍यासारखे मार्गदर्शक आमच्या विद्यार्थ्यांना उत्कृष्टता प्राप्त करण्यास मदत करतात. आम्‍ही आमच्‍या विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या आवडी जोपासण्‍यासाठी सदैव प्रोत्‍साहन आणि समर्थन देण्‍याचा प्रयत्‍न करतो. तज्ञांची व्याख्याने त्यांना त्यांच्या निवडलेल्या आवडींमध्ये उत्कृष्टतेसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन आणि एक्सपोजर देतात.’’

नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जीआयआएसने सतत ग्लोबल इंडियन स्टार्स व झंकार सारख्या गायन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. हे शिक्षणाच्या समग्र ९जेम्‍स फ्रेमवर्कशी संलग्‍न आहेजे शैक्षणिक आणि शिक्षणाव्‍यतिरिक्‍त उत्कृष्टतेच्या नऊ क्षेत्रांवर भर देते. कौशल्य विकास हा शाळेच्या शैक्षणिक तत्त्वाचा मोठा भाग आहे आणि आपली कौशल्‍ये अधिक निपुण करण्‍याची इच्‍छा असलेल्‍या विद्यार्थ्यांना व्यासपीठ प्रदान करण्यासाठी ते उत्तम तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधांचा वापर करते.

Leave a Reply

%d bloggers like this: