Thursday, August 27, 2026
Latest NewsPUNE

मध्यप्रदेश, राजस्थान लोकनृत्य कार्यशाळा उत्साहात !

ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी कला गटाकडून आयोजन

पुणे : ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळाच्या कला विषयक विशेष उद्दीष्ट गटाकडून आयोजित लोकनृत्य (मध्य प्रदेश व राजस्थान) कार्यशाळा शनीवारी उत्साहात पार पाडली. ही कार्यशाळा ज्ञान प्रबोधिनी भवन ( सदाशिव पेठ ) च्या उपासना मंदिरात दुपारी १२ ते ५ या वेळात आयोजित करण्यात आली होती. सुप्रसिद्ध कथक व लोकनृत्य नर्तक संजय महाजन ( मध्य प्रदेश ) यांनी मार्गदर्शन केले. मटकी,घुमर,गणगौर हे नृत्य प्रकार तसेच या लोकनृत्यांचा इतिहास, प्राथमिक पदन्यास, गीतांवरील नृत्य शिकवण्यात आले.कला गटाच्या वतीने डॉ.वैदेही केळकर ,मिलिंद संत, शिवाली वायचळ यांनी स्वागत केले. ‘लयशाळा ‘ संस्थेच्या आस्था कार्लेकर यांनी आभार मानले.

‘ आपला समाज उत्सव प्रिय असल्याने सणांच्या पासून नृत्याला प्रोत्साहन मिळाले. राजस्थानात लढायांच्या विजयानंतर नृत्य सादर करून विजय साजरी करण्याची प्रथा पडली. नृत्य आणि लयीची आवड असेल तर प्रशिक्षणांनी उत्तम नर्तक होता येते’, असे प्रतिपादन संजय महाजन यांनी केले तर ‘केवळ चित्रपटात पाहायला मिळते म्हणून नृत्याची कास कोणी धरू नये. त्याचा ध्यास घ्यावा ‘,असे आवाहन आस्था कार्लेकर यांनी केले.या कार्यशाळेचा पुढील भाग रविवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी १२ ते ५ वेळात होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading