Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

ठाणे : ववियाना मॉलमध्ये केलेली मारहाण राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना चांगलीत भोवली आहे. आव्हाडांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे.

आज सकाळी दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. जितेंद्र आव्हाड यांच्यासह १२ जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मॉलप्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात आता त्यांना १५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading