Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाविकास आघाडीचे अपयश आमच्या माथी मारु नये – देवेंद्र फडणवीस

नागपूर : उर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरुन सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प गेला अशा चुकीच्या गोष्टी प्रसारित करू नये. सर्व टाईमलाईन महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहे, असे फडणवीसांनी म्हटले आहे.

उर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प राज्याबाहेर गेल्या संदर्भात नागपूरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प गेला अशा चुकीच्या गोष्टी प्रसारित करू नये. सर्व टाईमलाईन महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्पाचे तीन पार्ट असतील, दोन पार्टची घोषणा होणे बाकी आहे. महाराष्ट्रातुन गेल्याचा कांगावा करणे चुकीचे आहे. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते, कुठलीही माहिती न घेता महाविकास आघाडीचं अपयश आमच्या माथी मारू नये. अधिकारी सुद्धा हताश होतात, कुठलीही माहिती न घेता जुन्या सरकारच्या काळातील गेलेले प्रकल्प आमच्या काळात गेले हे दाखवणे बंद केले पाहिजे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading