Thursday, August 27, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत ६५.५० टक्के मतदान

शिमला : हिमाचल प्रदेशमध्­ये राबविलेल्या विकासाचे धोरणामुळे पुन्हा सत्तेवर येण्याची आशा सत्ताधारी भाजपला वाटत आहे. तर काँग्रेसने देखील मतदारांना आकर्षित करण्याचे अनेक प्रयत्न केले. आज या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६८.५० टक्के मतदानाची नोंद झाली.

हिमाचल प्रदेशात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला ३५ जागांची गरज असते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४४ जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. आज मतदान प्रक्रिया पार पडली असून आता निकालाकडे लक्ष लागले आहे.
जगातील सर्वात उंचीवर असलेल्या ताशीगांग मतदान केंद्रावर लोकांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला. येथे एकूण ५२ मतदारांपैकी ५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, ताशीगांगमध्ये ९८.०८ टक्के मतदान झालं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading