Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

Pune – मार्केट यार्ड परिसरात गोळीबार ; २८ लाखांची रोकडही लंपास

पुणे: शहरातील मार्केट यार्ड परिसरात गोळीबार करण्यात आला आहे. यावेळी गोळीबार करत २८ लाख रुपयांची रक्कम लुटली असून आरोपी फरार झाले आहेत. ५ ते ६ आरोपी पी.एम. अंगडिया कार्यालयातून पसार झाले आहेत. पोलीस याप्रकरणी सध्या तपास करत आहेत. मात्र, भरदिवसा झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने पुण्यात दहशतीचे वातावरण आहे.

घटनेची माहिती मिळताच मार्केट यार्ड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मार्केट यार्ड परिसरात पी.एम. अंगडिया यांचे कार्यालय आहे. ते कुरिअर कार्यालय असल्याची माहिती आहे. आज याठिकाणी ४ ते ५ जण आले त्यांनी गोळीबार केला आणि तब्बल २८ लाखांची रोकड पळवून नेली.

तक्रारदार हे सकाळी ११ वाजताच्या दरम्यान त्यांच्या ऑफीसमध्ये आलेले होते. आल्यानंतर त्यांनी कॅश चेक केली. त्यानंतर पावणे १२ च्या सुमारास ५ आरोपी आले त्यांनी दारातून पिस्टल दाखवली. त्यानंतर दुस-या साथीदाराने त्यांनी खोलीतून ढकलून बाहेर काढले, मध्ये जी ग्लास होती ती गोळीबार करुन फोडली, त्यानंतर पाचही आरोपींनी आत येऊन रक्कम घेऊन गेले, अशी माहिती मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनघा देशपांडे यांनी दिली.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading