तुम्ही कायदा हातात घेतल्यावर जी शिक्षा व्हायची ती होणार चंद्रकांत पाटील यांचा आव्हाड यांना सवाल
पुणे :हर हर महादेव या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड आणि हाणामारी केली.त्यावरूनच जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यावर. ‘जर तुम्ही कायदा हातात घेतल्यावर जी शिक्षा व्हायची ती होणार’ असा सवाल भाजपचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांना केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या विरोधात लढणे, हा आजच्या महाराष्ट्रात गुन्हा झाला आहे.अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली होती. यावरुनही चंद्रकांत पाटील यांनी टीकास्र डागलं आहे. तुम्ही म्हणाल तोच इतिहास काय? तुम्हाला पाहिजे ते मांडायला हुकुमशाही आहे का? ही दादागिरी चालणार नाही” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहेत.
हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाशी मोडतोड झाल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता. यावरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. “संभाजीराजांबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र, त्यांच्याप्रमाणेच चित्रपट निर्मात्यालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या निर्मात्यांकडून इतिहास चुकीचा मांडला जात असल्यास त्यांनी जनप्रबोधन करावं. असे पाटील यांनी म्हटले आहे
चित्रपटात काय दाखवायचं याच पूर्ण स्वातंत्र्य चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखकाला आहे’ असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
