Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

स्पोर्टस फॉर ऑलच्या माध्यमातून पुण्यातील शालेय शिक्षक आणि शारीरिक शिक्षकांची बैठक संपन्न

– विविध ३७ शाळांमधील ८१ शिक्षक, शारीरिक शिक्षकांचा सहभाग
पुणे – भारतातील एक प्रमुख क्रीडा व्यासपीठ असणाऱ्या ‘सर्वांसाठी खेळ ‘(स्पोर्टस फॉर ऑल) संस्थेच्या वतीने शहरातील शाळांमधील शिक्षक आणि क्रीडा शिक्षक यांच्यात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुढील महिन्यात पुणे येथे स्पोर्टस फॉर ऑलच्या वतीने १ ते १५ डिसेंबर दरम्यान प्रथमच एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने बोलावलेल्या या चर्चेत शहरातील ३७ शाळांमधील साधारण ८१ शिक्षक आणि क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
स्पोर्टस फॉर ऑलने स्थापनेपासून समाजाच्या तळागाळापर्यंत क्रीडा प्रगती आणि प्रसार याकडे लक्ष पुरवले आहे. शाळांसाठी ऑलिम्पिक धर्तीवर क्रीडा स्पर्धेची घोषणा करून त्यांनी एका क्रीडा क्रांतीची जणू घोषणा केली आहे. यासाठी क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या शालेय क्रीडा शिक्षकांभोवती हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या बैठकीसाठी लॉयला प्रशाला, सिंहगड स्कूल, एज्युकॉन इंटरनॅशनल स्कूल, विबग्योग स्कूल, इंदिरा नॅशनल स्कूल, ध्रुव ग्लोबल स्कूलसह अन्य अनेक शाळांमधील शिक्षक, क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
सर्व प्रथम पुण्यात एसएफए अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करताना आम्ही कमालीचे उत्साही आहोत. क्रीडा शिक्षक आणि शिक्षकांबरोबर झालेल्या बैठकीत स्पर्धेतील खेळाडूंच्या एकूण सहभागाविषयी महत्वपूर्ण माहिती मिळाली. शालेय विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून एक आवश्यक व्यासपीठ मिळवून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. देशाच्या क्रीडा क्षेत्राला लाभदायक ठरेल अशा राष्ट्रीय प्रशिक्षकांचा एकत्रित समूह करण्याच्या कल्पनेला येथे चालना मिळाली. हे चर्चासत्र त्या दृष्टिने टाकलेले पहिले पाऊल म्हणता येईल, असे स्पोर्टस फॉर ऑलच्या मुख्य विपणन अधिकारी समेरा खान म्हणाल्या.
लॉयला प्रशालेचे शारीरिक क्रीडा संचालक आणि शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष मिलिंद क्षीरसागर म्हणाले, प्रशिक्षक आणि शिक्षकांसाठी हा एक चांगला उपक्रम आहे. त्यांच्या प्रवासात क्रीडा क्षेत्राची प्रगतीच होणार आहे. आम्ही त्यांच्या पहिल्या वहिल्या स्पर्धेची वाच पहात आहोत.
ऑलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी सर्वांसाठी खेळ (एसएफए ) भारतीय संघाची अधिकृत पुरस्कर्ती आहे. शालेय क्रीडा प्रशिक्षकांना क्रीडा प्रशिक्षणातील नवी तंत्राची ओळख करून देऊन अधिक चांगले खेळाडू शालेय स्तरापासून कसे मिळतील, त्याचबरोबर अधिक विद्यार्थी खेळाकडे कसे वळतील हे एसएफएचे उद्दिष्ट आहे.
सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्यामुळे एसएफए स्पर्धेत विद्यार्थ्यांना अधिक सक्षम होण्याची संधाही मिळणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेच्या १० हंगाम पू्र्ण झाले आहेत. आतापर्यंत ३० हजारहून अधिक शाळांमधून दीड लाखाहून अधिक विद्यार्थी खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
देशातील क्रीडा चेहरा असलेल्या हरभजन सिंग, साईना नेहवाल, सेमदेवदेव वर्मन, झहीर खान अभिनव बिंद्रा यांनी आतापर्यंत या स्पर्धेला उपस्थिती लावली आहे. मुंबई, हैदराबाद, डेहराडून शहरात या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आल्यानंतर आता पुण्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येच आहे. पुणे शहरातील मुलांना या स्पर्धेने भरपूर संधी निर्माण होणार असून, सहभागासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणी करायची आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading