Thursday, May 28, 2026
BusinessLatest News

‘वी’ वर अग्निवीर एअर फोर्स एक्स अँड वाय परीक्षांची तयारी करा

भारतीय हवाईदलामध्ये नोकरी मिळवणे ही भारतातील अनेक युवकांची महत्त्वाकांक्षा असते. २०२३ वर्षासाठी अग्निवीर वायू योजनेंतर्गत भरतीविषयी आयएएफने घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर वीने परीक्षाच्या सहयोगाने वी ऍपवर अग्निवीर एअर फोर्स एक्सअँडवाय ग्रुपसाठी परीक्षा तयारी साहित्य उपलब्ध करवून दिले आहे.

सरकारी परीक्षांच्या तयारीसाठी आघाडीचे इन्स्टिट्यूट असलेल्या परीक्षाच्या तज्ञांनी विशेष तयार केलेले अभ्यास साहित्य वी ऍपवर उपलब्ध असणार आहे.  नामांकित कॅडेट्स डिफेन्स अकॅडेमीने हे तयार केले आहे. यामुळे वी युजर्सना आयएएफ नोकऱ्यांसाठीच्या परीक्षांची तयारी करता येईल. संजीव ठाकूर यांच्यासह अकॅडेमीमधील सर्वोत्तम शिक्षकांचे लाईव्ह वर्गमॉक टेस्ट्स आणि इतर अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.   

सरकारी नोकऱ्यांसाठी तयारीची प्रक्रिया सहजसोपी व्हावी यासाठी वी जॉब्स अँड एज्युकेशनने केंद्र/राज्य सरकारी नोकऱ्या मिळवू इच्छिणाऱ्यांना परीक्षेच्या तयारीसाठीचे साहित्य उपलब्ध करवून दिले आहे  यामध्ये यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनबँकिंगशिक्षकसंरक्षणरेल्वे इत्यादी विविध विभागातील १५० पेक्षा जास्त अमर्याद मॉक टेस्ट्सचा देखील समावेश आहे.  ट्रायल कालावधी संपल्यानंतर संपूर्ण वर्षभरासाठी फक्त २४९ रुपयांची नाममात्र सबस्क्रिप्शन फी भरून युजर्स या प्लॅटफॉर्मवर आपले शिक्षण सुरु ठेवू शकतील. अनुभव घेण्यासाठी म्हणून वी जॉब्स अँड एज्युकेशनने विविध विभागांमध्ये एक मोफत मॉक टेस्ट उपलब्ध करवून दिली आहे.

अग्निवीर वायूसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. २३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येईल. २०२३ मधील भरतीसाठी अग्निवीर वायू च्या ऑनलाईन परीक्षा १८ जानेवारी २०२३ ते २४ जानेवारी २०२३ या कालावधीत होतील.

वी ऍपवर एअर फोर्स अग्निपथ वायू टेस्ट मटेरियल अशाप्रकारे मिळवता येईल.

परीक्षांच्या तयारीसाठी नीट संशोधन करून तयार करण्यात आलेले अभ्यास साहित्य वी ऍपवर वी जॉब्स अँड एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. वी युजर्स आपल्या सोयीप्रमाणे कुठेहीकधीही त्याचा लाभ घेऊ शकतात.  ‘वी’ ऍपवर ‘वी जॉब्स अँड एज्युकेशनमध्ये भारतातील सर्वात मोठा नोकरी शोध प्लॅटफॉर्म अपना‘, इंग्रजी शिकण्यासाठीचा आघाडीचा लर्निंग प्लॅटफॉर्म एनगुरू‘ आणि सरकारी नोकऱ्यांसाठीच्या परीक्षांच्या तयारीसाठीचा प्लॅटफॉर्म परीक्षा‘ यांना एकीकृत करून घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading