Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दोन अनाथांचे शैक्षणिक पालकत्व

केळेवाडीतील ओंकार आणि तेजश्रीला मिळाला मोठा आधार!

पुणे:कर्तृत्व, दातृत्व आणि नम्रता या तिन्ही गुणांचे मिश्रण म्हणजे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य आणि पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील! समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. त्याचा पुन्हा एक नवीन प्रत्यय कोथरुडकरांना अनुभवायला मिळाला. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळे कोथरुड मतदारसंघातील दोन अनाथ मुलांना मोठा आधार मिळाला आहे.

कोथरुडमधील केळेवाडी भागातील ओंकार आणि तेजश्री पवार ही दोन अशी रत्ने, जी शिक्षणासाठी अतिशय खडतर परिश्रम घेत आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असूनही येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा समर्थपणे सामना करुन शिक्षणासाठी धडपडत आहेत. पण काही दिवसांपूर्वीच या दोघाही भाऊ-बहिणींचे आई-वडिलांचे छत्र हरपले अन् त्यांच्यावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला.

त्यानंतर दोघांनाही त्यांची आजी रेखा शिंदे यांनी आधार दिला. रेखा शिंदे यांनी घरकाम करुन आपला आणि ओंकार व तेजश्रीचा उदरनिर्वाह, तसेच शिक्षणाचा भार उचलला. सर्वकाही सुरळीत सुरु होते, पण तेवढ्यात दोन्ही भाऊ-बहिणीला पुन्हा धक्का सहन करावा लागला. आजी रेखा शिंदे यांना अर्धांगवायूचा तीव्र धक्का आल्याने, त्या अंथरुणाला खिळल्या. त्यामुळे आर्थिक उत्पन्नच थांबले. परिणामी संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. तसेच शिक्षणाची ही आबाळ झाली.

ओंकार आणि तेजश्रीचे आईने निधनापूर्वी दोन्हीही मुलांचे शैक्षणिक शुल्क शाळेत भरले होते. पण तरीही गणवेश आणि शैक्षणिक साहित्य नसल्याने, अभ्यासात अनंत अडचणी येऊ लागल्या. त्यानंतर दोघाही भाऊ-बहिणींनी एक दिवस कोथरुडचे आमदार आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपली व्यथा माननीय दादांसमोर मांडली.

त्यानंतर माननीय दादांनीही दोघांचे दु: ख दूर केले. लोकसहभागातून ओंकार आणि तेजश्रीला सर्वप्रकारे शैक्षणिक मदत उपलब्ध करुन देण्याची ग्वाही देऊन, तात्काळ आपल्या कार्यकर्त्यांकडून शैक्षणिक साहित्य आणि गणवेश उपलब्ध करुन दिला. तसेच, दोघांच्याही उत्तम शिक्षणासाठी शैक्षणिक पालकत्वाची घोषणा केली. माननीय दादांच्या कृतीचे सर्वांकडून कौतुक होत असून, ओंकार आणि तेजश्रीच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमलले आहे. दोघेही पुन्हा एकदा नव्या जोमाने अभ्यास सुरु केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading