अडीच वर्षात कधी मातोश्री बाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी टीका करण्याच बंद करावं राणे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
पुणे : शेतकर्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि मदत करावी अशी मागणी विरोधक करीत आहेत. आम्ही राज्यातील राजकारण हे चांगले तापले. ओला दुष्काळ जाहीर न करता देखील आज आम्ही मदत करीत आहोत. ओला दुष्काळ जाहीर करण्यास केंद्र आणि राज्य सरकारचे काही नियम असतात. हेच ‘उद्धव ठाकरे निवडणुकीपूर्वी ५० हजार रुपये इतकी मदत शेतकर्यांना मिळाली पाहिजेअशी मागणी करीत होते. ते अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकर्यांना एकदा तरी मदत केली का ? ते एकदा तरी शेतकर्याच्या बांधावर गेले का ? औरंगाबाद येथे उद्धव ठाकरे गेले आणि तिथे ते किती तास होते तर केवळ २६ मिनिटे होते.अडीच वर्षात कधी मातोश्री बाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी टीका करण्याच बंद करावं’ असा टोला केंद्रीय मंत्री नारायणी राणे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
सुप्रिया सुळे यांच्याबाबत अब्दुल सत्तार जे बोलेले त्याच्या शब्दाचा विपर्यास करण्यात आला.आम्ही महिलांसाठी उद्योग आणत आहोत. महिलांच्या उद्योगाला पुढे नेत आहोत. त्यामुळे अब्दुल सत्तारच्या प्रश्नावर मला काहीच बोलायचे नाही, असे बोलून नारायण राणे यांनी या विषयावर बोलणे टाळले.
नारायण राणे म्हणाले,भारत जोडो ही घोषणा काँग्रेस करत आहे. पण ज्या ठिकाणी यात्रा चालली आहेे, तिथे लोकं दुसरीकडे जात आहेत. राहुल गांधीचा पायगुण चांगला नाही. ते जिथे जातात तिथे जाऊन काँग्रेस तोडो अशी यात्रा होत आहे.
राज्यातील प्रकल्प महाराष्ट्राभर जात असल्याने भाजपावर टीका होत आहे. मात्र, महाराष्ट्रात उद्योग प्रकल्प येण्याकरता वेटिंगलिस्टवर असल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
कालपर्यंत जे सत्तेवर होते, ते राज्यामध्ये उद्योग आणू शकले नाहीत, ते आता टिका करत आहेत. प्रकल्प गेले तसे येतील. महाराष्ट्र आणि मुंबईत उद्योग वेटिंग लिस्टवर आहेत. उद्योग महाराष्ट्रात यावेत याकरता पोषक वातावरण या नव्या सरकारकडून निर्माण केलं जाईल, असा माझा विश्वास आहे.असं नारायण राणे म्हणाले.
