Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

संभाजी भिडे अमृता फडणवीस यांना टिकलीवरून बोलण्याची हिंमत करतील का? अंधारे यांचा फडणवीस यांना सवाल

पुणे : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत असलेले ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे एका महिला पत्रकाराला टिकली न लावण्यावरून केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले.याच प्रकरणावरून आज ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३ (१९) ने प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य दिले आहे. तरी सुद्धा माध्यमप्रतिनिधी टिकली लावत नाही म्हणून एका महिला पत्रकाराशी अत्यंत असभ्य पद्धतीने बोलणारे संभाजी भिडे यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक शब्दही बोलले नाही. पण संभाजी भिडे अमृता फडणवीस यांना टिकलीवरून बोलण्याची हिंमत करतील का? असा थेट सवाल सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातील पत्रकार परिषदेत केला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, हाथरस प्रकरणात पोलिसांनी पीडितांचे शव जाळण्याचे काम केले त्यावर भाजपने चकार शब्द उच्चारला नाही. त्यामुळे भाजप कशाप्रकारे जनतेचा आवाज दडपते याचे हे तिसरे उदाहरण आहे. याचप्रद्धतीने महाराष्ट्रातील भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी दहिहंडीच्या कार्यक्रमात केलेले वक्तव्य.. ज्यात ते म्हणाले होते की, तुम्हाला कोणती पोरगी आवडते ते सांगा मी ती मुलगी उचलून आणून देतो. आम्ही लोकप्रतिनिधी निवडतो की आम्ही पोरी पळवणारा प्रतिनिधी निवडतो म्हणत सुषमा अंधारे भाजप नेते राम कदम यांच्यावर टीकास्त्र डागले.

अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांनी माफी मागावी. अब्दुल सत्तार यांना तुम्ही आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात नोटीस बजावता तर गुलाबराव पाटील यांना नोटीस का बजावत नाही, असा सवाल त्यांनी महिला आयोगाला विचारला आहे. महिला आयोगाने सिलेक्टिव्ह वागू नये. सत्तार आणि गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाई होत नसेल तर हे देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन होतं आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. गुलाबराव पाटील यांंच्याविरोधात तक्रार देण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना दोन वेळा फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. असा दावा देखील केला आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुचकामी ठरत आहेत. त्यांना हे झेपत नसेल तर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading