Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शिंदे व फडणवीस सरकारने गुजरात ची चाकरी करण्याचे ठरवले आहे -जयंत पाटील

पुणे :राज्यातील तीन प्रकल्प गुजरात मध्ये गेल्यामुळे विरोधक शिंदे व फडणीस सरकारवर टीका करत आहेत. तर सत्ताधारी यांनी विरोधकांनी तीन प्रकल्प गुजरातला नेले. असा आरोप करत आहे.
महाराष्ट्रातील सगळे प्रकल्प गुजरातला पळवून न्यायचे काम चालू आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ढिम् पणाने ते बघत बसले आहेत.
राज्यातील सर्व सुशिक्षित तरुणांची निराशा झाली आहे .foxcon आला असता तर ४ लाख लोकांना रोजगार मिळाला असता.महाराष्ट्र सरकार ने गुजरात ची चाकरी करण्याचे ठरवले आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
राज्यातील तरूणांना बेरोजगारीच्या खाईत लोटण्याचा महाराष्ट्र विरोधी उद्योग चालवणाऱ्या शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस ने जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन केले. तेव्हा जयंत पाटील बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले,महाराष्ट्रातील सगळे प्रकल्प गुजरातला पळवून न्यायचे काम चालू आहे. सरकार चा आत्मविश्वास कमी झाला आहे .महाराष्ट्र मध्ये यांचे गुजरात पुढे काही चालत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हतबल झाले आहेत. असे जयंत पाटील म्हणाले. राज्यात होणारी पोलीस भरती पुन्हा एकदा स्थगित राज्य सरकारने केली आहे.महविकास आघाडीने अनेक भरती बाबत निर्णय घेतले होते. सगळे प्रस्ताव पाठवून सुद्धा हे सरकार अडथळे आणत आहे.पोलिस भरती देखील व्हायला पाहिजे होती. पण तिथे ही अडथळा आणला . असे जयंत पाटील म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक ‘सामना’मधील जाहिरात सध्या राजकीय वर्तुळात चर्चेची विषय ठरली आहे. दैनिक सामनाच्या मुख्य पानावर माहिती व जनसंपर्क विभागाकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.सामना च्या मुखपृष्ठवर जाहिरात आहे .कोट्यवधी रुपये jr सरकार खर्च करणार असेल तर कुठला वर्तमानपत्र नाही म्हणेल. पण पहिले पान उलटल्यानंतर आतील पानात जे वाचलं तर पहिला पानाच्या जाहिरातीवरची किंमत शून्य होते.सरकारने डोकं ठिकाणावर ठेवलं पाहिजे .सामनाला जाहिरात देण्या आधी . असे जयंत पाटील म्हणाले.
मंत्रालयात संभाजी भिडे भीमा कोरेगाव केस मधील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व यांनी महिला पत्रकाराला तू कपाळावर कुंकू लावला नाही टिकली लावली नाही म्हणून तिला अपमानित केले. त्यामुळे सामाजिक संस्थां सह विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यावर जयंत पाटील म्हणाले, हेअनाकलनीय आहे.महाराष्ट्रातील सगळ्या महिला त्यांचा निषेध करतील. मी त्यांचे कधी ही समर्थन केलेले नाही.सत्ता रूढ पक्ष ही प्रवृत्ती जपते आहे. असे जयंत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading