fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार

पुणे:- एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ ” या उक्ती प्रमाणे 2 ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतनिमित्त मागील एक ते दोन वर्षांपासून पिंपरी चिंचवड महानरपालिका आणि प्रभाग क्रमांक ड , या विभागातील वेगवेगळ्या सामजिक संस्था यांच्या माध्यमातून पर्यावरण , आरोग्य, स्वचछता सर्वेक्षण 2023, शिक्षणं, महिला सबलीकरण या सामाजिक प्रश्नावर, काम करणाऱ्या सामाजिक संस्थाचा आणि सामाजिक का्यकर्त्याचा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला , या सोहळ्या मध्ये स्वच्छते विषयक जनजागृती , पर्यावरण , आरोग्य या सामाजिक कार्यात अग्रेसर काम व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अजिंक्य सोशल फाऊंडेशन ,पुणे या संस्थेचा सन्मानपत्र आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला , अजिंक्य सोशल फाउंडेशनच्या मार्फत पिंपरी चिंचवडमध्ये मागील 3 ते 4 वर्षापासून विविधअंगी सामाजिक कामे करत ,आहे, त्यामध्ये स्वच्छतेविषयक जनजागृती पर कार्यक्रम घेणे, सफाई कर्मचारीचा कोविड योद्धा सत्कार असेल, कोविड मध्ये प्रशिक्षण देणे, महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीमध्ये स्वच्छता कशी ठेवावी ,गरजू लोकांना खाद्य पदार्थाच्या किट वाटप करणे, आरोग्यात तपासणी शिबीर लावणे , या सामाजिक कार्यात अजिंक्य सोशल फाउंडेशनचा याकार्य नेहमीं उल्लेखनीय कार्य केले जाते, याची दखल घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीपजी जांभळे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला , यावेळी सहायक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड , महेश आढाव ( AHO) अतुलजी सोनवणे(एस. आय) शुभम कांबळे, रामू जगताप, राहुल ओव्हाळ, इतर अधिकारी व कर्मचारी, बेसिक टीम च्या भावना पाठक, फाउंडेशनचे कार्यकर्ते सचिन पवार, बाळासाहेब राठोड, सुदाम बारकडे ,जगदेवी घोडके,संगीता भालेराव,सोनाली करपे, समृध्दी मोरे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading