Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

क्रांतिसूर्य महात्मा फुले स्मारकासमोर पतित पावन संघटनेतर्फे दीपोत्सव

पुणे : ऐन दिवाळीत मीठगंज पोलीस चौकी शेजारील अंधारात असलेल्या क्रांतिसूर्य महात्मा फुले स्मारकासमोर पतित पावन संघटनेतर्फे दीपोत्सव साजरा आला. ज्या महात्मा फुले यांनी संपूर्ण आयुष्य समाजातील अंधार घालविण्यासाठी महिलांच्या आयुष्यात शिक्षणाचा दिवा लावला. त्या अधांरात असलेल्या महात्मा फुले यांच्या स्मारक परिसरातील दिवे पुणे मनपा ला सांगून पुन्हा लावून घेत दिपोत्सव साजरा केला.

त्यावेळी रा.स्व.संघाचे महात्मा फुले नगर कार्यवाह मंगेश शिंदे, पतित पावन संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे, संतोष अण्णा शेंडगे, ललित खंडाळे, गुरु कोळी,योगेश वाडेकर, राजाभाऊ रजपूत, सूरज पोटे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उमेश नाईक, अविनाश नाईक, केशव पाटिल व अभिजीत मारणे उपस्थित होते

मंगेश जवाहिरे यांनी स्मारकाभोवती नयनरम्य रंगावली काढली. कार्यक्रमाचे आयोजन योगेश पाटील, ऋतिक कांबळे, ओंकेश काची, संदेश वाघमारे, साहिल कांबळे, सोनू ताड़े आणि स्वप्नील नाईक यांनी केले. दरवर्षी पुणे मनपा कडून महात्मा फुले स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात येते, तरीही मात्र ऐंन दिवाळीत महात्मा फुले यांच स्मारक अंधारात होते, हे दुर्देव असल्याचे स्वप्नील नाईक यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading