Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

सरकारने राज्यातील तरुणांना रोजगार कसा मिळेल यांचा गांभीर्याने विचार करायला हवा -अजित पवार

पुणे:वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्कनंतर आता टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप होत आहे.वेदांता चा प्रकल्प गुजरात मध्ये गेला .त्यापेक्षा मोठा प्रकल्प आणू असं सांगितलं.मात्र आता एअर बस प्रकल्प गुजरात ला गेला.अशावेळी आधीच्या सरकारने काय केलं, या सरकारने काय केलं याविषयी आरोप प्रत्यारोप करत बसण्या पेक्षा राज्यातील तरुणांना रोजगार कसा मिळेल यांचा गांभीर्याने विचार आवश्यक करायला हवा. असे राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले.

या पत्रकार परिषदेला प्रवक्तेप्रदीप देशमुख, खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे, प्रशांत जगताप उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले,प्रकल्प कुणाच्या नाकर्ते पणामुळे जाताहेत का?एका राज्यात येऊ घातलेले प्रकल्प दुसऱ्या राज्यात जातात यात काही राजकारण आहे का? हे सरकारने या बघितले पाहिजे.असे पवार म्हणाले.
मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना यंदाची दिवाळी साजरी करता आली नाही, कारण पावसामुळे त्यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकाचे सोयाबीन, कापूस नुकसान झाले होते”, असे पवार यांनी म्हटले‌आहे.
अजित पवार म्हणाले,कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नातेवाईकांसह कोणालाच भेटता आले नाही. मात्र, यंदा जोरदार दिवाळी साजरी करण्यात आली. परंतु, दिवाळी साजरी केली असली, तरी एका गोष्टीचे दु:ख आहे, ते म्हणजे राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. आजही अनेक शेतकरी चिंतेत आहेत, काही जण आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाबाबत मी दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना निवेदन दिले होते. तसेच, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. असे अजित पवार म्हणाले.

भाजप नेत्याच्या कार्यक्रमात वाजलं राष्ट्रवादीचं गाणं वाजल आहे. पुण्यात हा प्रकार घडला आहे. कार्यक्रमासाठी भाजप नेत्याची एन्ट्री झाली आणि डीजेवर राष्ट्रवादीचं गाणं सुरु झालं.यामुळे सकगळेच जण गोंधळून गेले. तात्काळ हे गाण बंद करण्यात आले. यानंतर पोलिसांनी या कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीमची अरेंजमेंट करणाऱ्या डीजेला ताब्यात घेतले.अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. जर कार्यक्रमात राष्ट्रवादीच गाणं वाजलं तर बिघडलं कुठं? कधी कधी एखाद्या कार्यक्रमात होतं एवढ त्याला महत्व देण्याची गरज नाही असे अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सत्तार यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटावर टीका करतानाच ठाकरे घराण्यावरही जोरदार हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. आता तर त्यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख छोटा पप्पू असा केला आहे. अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना पप्पू म्हटलं, ही आपली संस्कृती आहे आहे का?असा सवाल अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांना उपस्थित केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading