शेतकऱ्यांवर फक्त घोषणांचा पाऊस होतोय, मात्र प्रत्यक्षात मदत काहीच मिळत नाहीय -बाळासाहेब थोरात
मुंबई: महात्मा फुले कृषी कर्ज योजनेला सरकारने गुरुवारपासून सुरुवात केली आहे. प्रोत्साहानपर अनुदान म्हणून ५० हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने भरले आहे. एकूण राज्यातील सात लाध शेतकऱ्यांच्या खात्यात १५ हजार कोटी एवढी रक्कम सरकारने भरली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माहिती सांगितली आहे. मात्र अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे, त्यामुळं सरकारनं केलेली ही मदत तोकडी असून, सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत दिली पाहिजे असं विरोधकांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सरकारच्या या मदतीवर काँग्रेस नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टिका केली आहे. शेतकऱ्यांवर फक्त घोषणांचा पाऊस होतोय, मात्र प्रत्यक्षात मदत काहीच मिळत नाहीय, अशी टिका बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. काल औरंगाबाद येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दुष्काळाची पाहणी करताना, थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसानीची पाहणी केली. यानंतर त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळाली पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मात्र आज शेतकऱ्यांवर फक्त घोषणांचा पाऊस होतोय, मात्र प्रत्यक्षात मदत काहीच मिळत नाहीय, अशी टिका बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके वाया गेली आहेत. अशा संकट काळात सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. ही सर्वांची अपेक्षा असते. मात्र सरकारकडून वृत्तपत्र, टीव्ही चॅनलवर फक्त घोषणांचा पाऊस सुरू असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाहीत. काही लोक दौरे करून फक्त फोटो टाकतात. मात्र शेतकऱ्यांना मदत नाही ही वस्तुस्थिती आहे.
